Water Crisis
Water Crisis  Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : पाणीटंचाई मराठवाड्यात, धडकी नाशिकमध्ये

Team Agrowon

Nashik News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा असला, तरी मराठवाड्यातील जायकवाडी धरणामधून कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने तेथील पाणीसाठा ३७ टक्क्यांच्या खाली येणार आहे.

त्यामुळे मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार गंगापूर धरणात ६१ टक्के पाणीसाठा ठेवावा लागणार आहे. उर्वरित पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागणार असल्याने टंचाई मराठवाड्यात असली, तरी धडकी मात्र नाशिकला भरली आहे. पाटबंधारे विभागाकडून देखील शासनाने धरणांच्या पाण्याची टक्केवारी मागविल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा या तीन धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. गंगापूर धरणातून शहराला अधिकाअधिक पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरण समूहात जवळपास ९० टक्के पाणीसाठा आहे.

हा पाणीसाठा वर्षभर पुरेल इतका आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे; परंतु धरणातील समाधानकारक पाण्याच्या टक्केवारीचा आनंद दीर्घकाळ टिकणारा नाही. त्याला कारण म्हणजे, मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात कमी होणारा पाणीसाठा हे होय.

सद्यःस्थितीत जायकवाडी धरणात ३७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. मेंढीगिरी समितीच्या शिफारशीनुसार ३७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असेल, तर वरच्या धरणांमध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात ८१ टक्के पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे.

परंतु सद्यःस्थितीत मराठवाड्यातील कालव्यांना जायकवाडीमधून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची टक्केवारी कमी होऊन ३५ टक्क्यांपर्यंत हा साठा स्थिरावल्याचे बोलले जात आहे. पाण्याची कमी होणारी टक्केवारी नाशिककरांना धडकी भरविणारी आहे.

अतिरिक्त पाण्याची नोंद

२५ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धरणातील साठ्याचा आढावा घेऊन पाण्याची मागणी नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार गंगापूर धरणातून ४४००, दारणा धरणातून शंभर, तर मुकणे धरणातून १७०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी महापालिकेने नोंदविली आहे.

...असा आहे टक्केवारीचा रेशो

टप्पा एक : जायकवाडी धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा असल्यास मुळा धरण समूहात ४९ टक्के, प्रवरा ५५ टक्के, दारणा धरण समूहात ५४ टक्के, पालखेड धरणात ७३ टक्के, तर गंगापूर धरणात ६१ टक्के पाणीसाठा ठेवावा.

टप्पा-२ व ३ : जायकवाडी धरणात ५४ टक्के ते ६५ टक्के पाणीसाठा असेल, तर मुळा धरण समूहात ६५ ते ७९ टक्के, प्रवरात ७९ ते ९३ टक्के, धरणात ८४ ते १०२ टक्के, पालखेड ७३ ते ८२ टक्के,गंगापूर धरण समूहात ७४ ते ८२ टक्के पाणीसाठा ठेवावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cashew MSP : काजू बी हमीभावासाठी कृषिमंत्र्याची भेट घेणार

Crop Insurance : विमा प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक आता ग्रामपंचायतीत लावणार

Agriculture Department : अकोल्याचा ‘आत्मा’ चालतो अवघा ३० टक्के पदांवर

Agriculture Award : महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

Chana Market : अकोल्यात हरभऱ्याला प्रतिक्विंटल सहा हजारांचा दर

SCROLL FOR NEXT