Water Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : पावसाळ्यात पाणीटंचाई; नागरिकांचे ठिय्‍या आंदोलन

ठाणे : धरणे, जलाशय दुथडी भरून वाहू लागले तरी अंबरनाथच्या पूर्व भागातील भेडसावणारी अनियमित आणि अपुऱ्या दाबाने येणारी पाणी समस्या काही दूर होत नसल्याने संतप्त नागरिकांनी पाणी खात्याच्या कार्यालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले.

Anil Jadhao 

अंबरनाथ, जि. ठाणे : धरणे, जलाशय दुथडी भरून वाहू लागले तरी अंबरनाथच्या (Ambarnath) पूर्व भागातील भेडसावणारी अनियमित आणि अपुऱ्या दाबाने येणारी पाणी समस्या काही दूर होत नसल्याने संतप्त नागरिकांनी (People Protest) पाणी खात्याच्या कार्यालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले.

अंबरनाथच्या पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सर्जेराव माहुरकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर नागरिकांनी

आंदोलन केले.

पूर्वेकडील ताडवाडी, हाल्याचा पाडा, अश्विनी हॉस्पिटल परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागते.

पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्याचा नागरिकांना नाईलाजाने वापर करावा लागतो. भर पावसाळ्यातही कधी कधी टँकर मागवावे लागतात, याबाबत माहुरकर यांनी तीव्र शब्‍दांत संताप व्यक्त केला. पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच तोडगा काढण्‍यात आला नाही तर

तीव्र आंदोलनाचा थेट इशारा माहुरकर यांनी महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाच्‍या अधिकाऱ्यांना दिला.

सर्जेराव माहुरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात राजाराम ठाकूर, दिनेश घोडविंदे, निर्मला पाटील, यशोदा भंडारी,

संगीता तपासे आदींचा समावेश होता.

पाणी समस्येवर लवकरात लवकर

तोडगा काढण्याच्या

मागणीचे निवेदन या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची पुढची कार्यवाही सुरु, कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार?, मुख्यमंत्री फडणवीसांची महत्त्वाची माहिती

Self Help Groups: बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर विक्रीची संधी मिळावी

Khamgaon APMC: खामगाव बाजार समितीत ‘शिदोरी गृहा’स प्रारंभ

Agriculture Rail Transport: शेतमालासाठी रेल्वे वाहतूक

Agriculture Development: कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT