Cauvery Water Crisis agrowon
ताज्या बातम्या

Latur Water Crisis : लातूर जिल्ह्यातील १४२ प्रकल्पांतील पाणी राखीव

Latur Rain Update : लातूर जिल्ह्यात पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच मॉन्सूनमध्ये पावसाची प्रगतीही नाही.

Team Agrowon

Latur News : लातूर जिल्ह्यात पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच मॉन्सूनमध्ये पावसाची प्रगतीही नाही. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागांत पिण्याच्या पाण्याच्या झळा आता बसू लागल्या आहेत. पाऊस पडेल की नाही याची शाशंकता असल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून सर्व मध्यम, लघू पाटबंधारे यातील पाणी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी काढला आहेत.

जिल्ह्यात आठ मध्यम व १३४ लघू प्रकल्प आहेत. त्यामुळे या सर्व १४२ प्रकल्पांतील पाणी आता राखीव ठेवले जाणार आहे. या वर्षी जिल्ह्यात पहिल्यापासूनच कमी पाऊस राहिला आहे. त्यात ऑगस्टमध्ये तर महिनाभर पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली.

याचा परिणाम जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पाणी प्रकल्पावर झाला आहे. तसेच पाणीपातळीही आता खाली जाऊ लागली आहे. पावसाची शक्यता धूसर आहे. त्यामुळे भविष्यातील टंचाई लक्षात घेता प्रशासन कामाला लागले आहे.

जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणात सध्या ४१.९९९ दलघमी उपयुक्तपाणीसाठा असून, त्याची टक्केवारी २३.७३ इतकी आहे. तसेच निम्न तेरणा प्रकल्पात २४.४०७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी २६.७६ इतकी आहे.

दोन मध्यम प्रकल्पांत तर उपयुक्त पाणीसाठा राहिलेला नाही. इतर प्रकल्पांचा पाणीसाठाही हळूहळू कमी होत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पातील उपयुक्त असलेल्या पाण्याच्या पातळीचा आढावा घेऊन संभाव्य पाणीटंचाई उद्‍भवू नये यासाठी लातूर जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठे टंचाई कालावधीमध्ये केवळ पिण्याच्या पाण्यासाठी या आदेशाद्वारे आरक्षित करण्यात आले आहे.

या आदेशानुसार यंत्रणेच्या कार्यक्षेत्रातील सर्व पाणी साठे आरक्षित करण्यात आले आहेत. त्या प्रकल्पातील पाणीसाठा अनधिकृतपणे उपसा होणार नाही. याची दक्षता पाटबंधारे विभागाने घ्यावी. त्या त्या पाटबंधारे क्षेत्रातील कार्यकारी अभियंता यांनी धरणातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता पथक नियुक्त करावेत, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील आणि शहरातील औद्योगिक क्षेत्रातही येणाऱ्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी कपात करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पांचा पाणीसाठा

मोठे प्रकल्प दोन

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा २६८.२८४ दशलक्षघनमीटर

सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा ६६.४०६ दशलक्षघनमीटर

उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २४.७६

मध्यम प्रकल्प आठ

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा १२२.१५४ दशलक्षघनमीटर

सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा २५.१०९ दशलक्षघनमीटर

उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २०.५६

लघू प्रकल्प १३४

प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा ३१४.४३४ दशलक्षघनमीटर

सध्याच्या उपयुक्त पाणीसाठा ७१.७९९ दशलक्षघनमीटर

उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २२.८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT