Raon Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain : पावसाच्या उघडिपीमुळे धरणांतून विसर्ग घटविला

पावसाने उघडीप घेतल्यानंतर धरणांतील पाण्याच्या आवकेत काहीशी घट होऊ लागली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नव्याने ५.८२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : पावसाने उघडीप घेतल्यानंतर धरणांतील पाण्याच्या आवकेत (Water Inflow In Dam) काहीशी घट होऊ लागली आहे. बुधवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नव्याने ५.८२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे विसर्गातही (Water Discharge From Dam) किंचित घट करण्यात आली आहे. तर काही धरणांतून पाण्याच्या विसर्गात वाढही करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक ११४ मिलिमीटर पाऊस पडला असून, वळवण ६६, लोणावळा ६२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. टेमघर, वरसगाव, पानशेत, पवना, कळमोडी, वडीवळे, आंध्रा, गुंजवणी, नीरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या.

सध्या मुठा खोऱ्यातील चांगल्या असलेल्या पावसामुळे टेमघर, वरसगाव, खडकवासला या धरणांतून पाण्याचा विसर्ग काहीसा पुन्हा वाढविण्यात आला आहे. नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांतून कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये वीर धरणांतून सर्वाधिक ७ हजार २४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणातून कमीअधिक स्वरूपात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोड धरणांतून ५ हजार ४७५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर विसापूर, उजनी, मुळशी या धरणांतूनही पाण्याचा बऱ्यापैकी विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुठा, पवना, आरळा, भीमा, भामा, इंद्रायणी, कऱ्हा, घोड, कुकडी, नीरा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरण

खडकवासला, कासारसाई, चासकमान, भामा आसखेड, भाटगर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, डिंभे, चिल्हेवाडी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही तुरळक पाऊस पडला. तर घोड, वीर, विसापूर, उजनी, नाझरे, शेटफळ या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Husbandry Schemes: पशुसंवर्धन विभागाच्‍या योजना ठप्‍प झाल्याने शेतकरी अडचणीत

Agriculture Department: कृषी निविष्ठा विक्रेत्यांवरभरारी पथक ठेवणार नजर

AI In Agriculture: ‘एआय’ तंत्रज्ञान वापरून ऊस उत्पादन वाढवा

Summer Mung: उन्हाळी मुगाची लागवड देतेय आर्थिक आधार

Chana Tur Disease: हरभरा, तूर पिकांवर रोग प्रादुर्भावाचे सावट

SCROLL FOR NEXT