Almatti Dam Agrowon
ताज्या बातम्या

Almatti Dam Water : दिलासादायक! पश्चिम महाराष्ट्रावरील महापुराचे संकट टळले? अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला

Almatti Dam Water Level Update: अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

Team Agrowon

Maharashtra Dam Water : पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका होऊ नये यासाठी धरणातील पाणी साठ्यांचा विसर्ग होण्याची मोठी गरज असते. दरम्यान कर्नाटक राज्यात असणाऱ्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसतो. परंतू यंदा हा धोका टळण्याची शक्यता आहे. यंदा अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूराचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे.

आलमट्टी धरणातील पाणीसाठा व तेथील पाण्याच्या विसर्गावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष असते; तर महाराष्ट्रातील कोयना व अन्य धरणांतून होणाऱ्या विसर्गावर कर्नाटक पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून असतो. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणातून जवळपास १० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कृष्णेच्या उपनद्यांवरील धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे कोयना आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गाच्या पाण्याचा थेट परिणाम सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पिकांवर होतो. परंतु महापुराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातून योग्य पद्धतीने विसर्ग झाला तर महापुराचा धोका टाळता येतो. यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने परस्पर चांगला समन्वय ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली आहे. धरण परिसरात होणारा पाऊस लक्षात घेता अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे, काल (ता.२५) सकाळी ३० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू होता तो दुपारी १ वाजता ४२ हजार ५०० करण्यात आला. तर आज पुन्हा विसर्ग वाढण्यात आला आहे. दुपारी ४ वाजल्यापासून ४२ हजार ५०० वरून तो ७५ हजार करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यामुळे अलमट्टी धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२४ तासांत २० टीएमसी पाणीसाठा वाढला

अलमट्टी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. २५ जुलै रोजी सकाळी आठ वाजता धरणातील एकूण पाणीसाठा ७१.८१४ टीएमसी इतका होता, तर जिवंत पाणीसाठा ५४.१९४ टीएमसी इतका असल्याची माहिती कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

रविवारी आलमट्टी धरणात ५३.२४९ टीएमसी पाणीसाठा होता. दोन दिवसांत पाणीसाठ्यात सुमारे २० टीएमसीने वाढ झाली आहे. आलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८१ टीएमसी आहे.

कर्नाटक महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचा समन्वय

महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा, विसर्ग व आलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग यामध्ये समन्वय आहे. यामुळे कोयना आणि अलमट्टी धरण विभागातील अधिकाऱ्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात राहण्यासा मदत होणार आहे. या समन्वयामुळे सुसूत्रता आल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी महाराष्ट्राच्या पाटबंधारे खात्याकडून आलमट्टी येथे एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Compensation Demand: प्रति हेक्टरी ७० हजारांची भरपाई द्यावी

Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार

Rabi Intercropping: रब्बीत कोरडवाहू क्षेत्रात आंतरपिकाचे पर्याय कोणते? अधिक उत्पादनासाठी आंतरपीक गरजेचे

Irrigation Project: ‘मसलगा’च्या दुरुस्तीला वेग द्या; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

Farmer Protest: शेतकरीपुत्रांचा भूम येथे रास्ता रोको

SCROLL FOR NEXT