Agriculture Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Irrigation : डिंभे उजव्या कालव्याला आवर्तन

Dam Water : हुतात्मा बाबू गेणु जलाशयातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : हुतात्मा बाबू गेणु जलाशयातून (डिंभे धरण) उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी (ता. १८) आदर्शगाव गावडेवाडी, जारकडवाडी, पोंदेवाडीच्या पुढे कालव्यातील पाणी गेले.

दरम्यान पाऊस लांबणीवर पडल्याने शेतातील पिके विशेषतः गुरांचा चारा सुकू लागला होता. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न व्यवस्थेसाठी पाणी सोडण्यात आले आहे. आंबेगाव व शिरूर तालुक्यातील ५०हून अधिक गावांतील शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग होणार आहे.

पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत होते. विहिरीतील पाण्याने तळ गाठला होता. या प्रार्श्‍वभूमिवर गेल्या आठवड्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळाने भेट घेऊन डिंभे धरणातून उजव्या कालव्यात पाणी सोडण्याविषयी मागणी केली होती.

त्यानुसार त्यांनी तातडीने पाटबंधारे खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कालव्यात पाणी सोडल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. १०५ किलोमीटर अंतरावर कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे पाणी लवकरच पोचणार आहे, असे भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.

आंबेगाव व शिरूर तालुक्यात उजवा कालवा, पोटचाऱ्या, घोड शाखा याद्वारे शेतजमिनीला पाणी उपलब्ध होत आहे. शेतकऱ्याकडे सुमारे दोन कोटी रुपये रक्कम पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे.
- दत्ता कोकणे, अभियंता, जलसंपदा विभाग, आंबेगाव-शिरूर तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farmers: सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा 

Banana Price Crash: निर्यातक्षम केळीस १५ ते २० रुपये दर

MSP Procurement: हमीभावाने १५ पासून खरेदी

Space Farming: चंद्रावरही शेती शक्य होणार; नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रयोग सुरु

Tractor Emission Norms: ‘ट्रेम ५’ मुळे ट्रॅक्टर होतील अधिक पर्यावरणपूरक

SCROLL FOR NEXT