Contaminated Water Agrowon
ताज्या बातम्या

Contaminated Water : सांगली जिल्ह्यातील १३८ गावांतील पाणी दूषित

Sangli Water Issue : जिल्ह्यातील १३८ गावांमधील पाणी दूषित असल्याचे दिसून आले आहे. जूनमध्ये जिल्ह्यात ३६३३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील १३८ गावांमधील पाणी दूषित असल्याचे दिसून आले आहे. जूनमध्ये जिल्ह्यात ३६३३ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १३८ गावांतील १७२ ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

संबंधित ग्रामपंचायतींना दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गावांचे पाणी नमुने पुन्हा दूषित आल्यास ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

राष्ट्रीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्व्हेक्षणाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यंत्रणेकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काही गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. लोकांना शुद्ध पाणीपुरवठा होऊन साथीच्या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी पाण्याचे नमुने तपासले जातात.

हे पाणी नमुने तपासणी अभियान जुलै अखेरपर्यंत चालणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील एकूण तीन हजार ६३३ पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी १३८ गावांतील १७२ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.

पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांची नावे

आटपाडी : पळसखेल, दिघंची, विठ्ठलापूर, आवळाई, पुजारवाडी (दिघंची), गोमेवाडी, तडवळे, खरसुंडी, कामथ, नेलकरंजी, वलवण, विभूतवाडी, पारेकरवाडी.

जत : डोर्ली, डफळापूर, सिद्धनाथ, लमाणतांडा (द), उमदी, शेडयाळ, अचकनहळ्ळी, रामपूर.

कवठे महांकाळ : जायगव्हाण, नांगोळे, करलहट्टी.

मिरज : भोसे, सिद्धेवाडी, शिपूर, जानराववाडी, चाबुकस्वारवाडी, खंडेराजुरी, पायाप्पाचीवाडी, शिपूर, सलगरे, जूनीधामणी, नरवाड, माधवनगर, कर्नाळ, नांद्रे.

तासगाव : बोरगाव, निंबळक, पुणदी, मांजर्डे, डोर्ली, सावळज, अंजनी, खुजगाव, डोंगरसोनी, सिद्धेवाडी.

पलूस : वसगडे, खंडोबाचीवाडी, धनगाव, आमणापूर, बुर्ली, भिलवडी, अंकलखोप, नागठाणे, कुंडल, दहयारी, पुणदीवाडी, दुधोंडी, रामानंदनगर, सावंतपूर, नागराळे, मोराळे.

वाळवा : भडकंबे, शिगाव, बागणी, कोरेगाव, रोजावाडी, फाळकेवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, शिवपुरी, येडेनिपाणी, कामेरी, तुजारपूर, वाटेगाव, शेणे, तांबवे, येवलेवाडी, वशी, अहिरवाडी, लामणमाची, कोळे, रेठरेहरणाक्ष, बहादूरवाडी, मालेवाडी, इटकरे, कणेगाव.

शिराळा : अंत्रीबु, अंत्रीखुर्द, पाडळी, कदमवाडी, रेड, वेलदारवाडी, तडवळे, सावंतवाडी, पणुब्रेवारुण, फुपेरे, अस्वलेवाडी, धसवाडी, माळेवाडी, मोरेवाडही, शिंदेवाडी, सांगाव, कणदूर, पुनवत, नाटोली, भाटशिरगाव, धामवडे, गिरजवडे, पतशिराळा, बांबवडे, पाचुंब्री.

खानापूर : हिवरे, पळशी, ताडाचीवाडी, मुलाणवाडी, लेंगरे, देवनगर, कार्वे, बलवडी.

कडेगाव : शाळगाव, बेलवडे, उपाळेमायणी, सासपडे, हिंगणगाव बुद्रुक, उपाळेवांगी, रायगाव, वांगी, शेळकबाव, देवराष्ट्रे, सोहोली, खंबाळे, तडसर, वडियेरायबाग, विहापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT