Agricultural Science Centre Agrowon
ताज्या बातम्या

Water Management : गाव पातळीवर पाण्याचा ताळेबंद ठेवणे आवश्यक

पडणाऱ्या पावसाचा हिशेब ठेवण्यासाठी गाव पातळीवर पाण्याचा ताळेबंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवणी (ता. जालना) येथील केंद्र शासन पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण उद्धवराव खेडेकर यांनी वानडगाव (ता. जालना) येथे केले.

Team Agrowon

जालना : पडणाऱ्या पावसाचा (Rain Data) हिशेब ठेवण्यासाठी गाव पातळीवर पाण्याचा ताळेबंद (Water Management) ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवणी (ता. जालना) येथील केंद्र शासन पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण उद्धवराव खेडेकर यांनी वानडगाव (ता. जालना) येथे केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने ‘‘जलशक्ती अभियान - कॅच दी रेन’’ अंतर्गत वानडगाव येथे शुक्रवारी (ता. ११) आयोजित शेतकरी प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांच्यासह वानडगावचे सरपंच नामदेव नागवे, कृषी अभियंता पंडित वासरे, पीक संरक्षण तज्ञ अजय मिटकरी, कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सुधाकर ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खेडेकर म्हणाले, की पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून आपली जमीन समृद्ध करावी. पाऊस मोजण्यासाठी गावात पर्जन्यमापक यंत्र असावे व वर्षभर पडणाऱ्या पावसाचा हिशेब ठेऊन पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन करावे असे ते म्हणाले. .

डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मुलस्थानी जलसंधारण आणि जल संधारणाच्या कृषी शास्त्रीय पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. कृषी अभियंता पंडित वासरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास जलसंधारण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अजय मिटकरी यांनी तूर पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सलमान पठाण यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bhavantar : मध्य प्रदेश सरकारने सोयाबीनचा भावफरक केला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा; महाराष्ट्रात मात्र सोयाबीन खरेदी कासव गतीने

Farmers Protest: ‘सीनारमास’ विरोधात शेतकरी आक्रमक

Lumpy Skin Disease: लम्पी रोग पुन्हा फोफावला! शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Soybean Procurement: सोयाबीन खरेदी केंद्रांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळेना

Kolhapur Politics: कागलच्या राजकारणाला कलाटणी, कट्टर विरोधक हसन मुश्रीफ- समरजितसिंह घाटगे एकत्र, युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT