Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात कृषीपंपाचे भारनियमन होत असल्याने हे भारनियमन रद्द करावे, या मागणीसाठी फेडरेशन व पाणीपुरवठा संस्थांकडून ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे प्रमुख विक्रांत पाटील- किणीकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
यावेली विक्रांत पाटील म्हणाले की, कृषिपंपांचे भारनियमन बंद करावे. तसेच, सहकारी पाणीपुरवठा संस्थांची वीज बिलांची पोकळ थकबाकी शासनाच्या निर्णयानुसार कमी करावी; अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. यातच महावितरण कंपनीने भारनियमन सुरू केले.
पावसाने ओढ दिल्यामुळे पिके वाळत आहेत. त्यांना जगविण्यासाठी शेतकरी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. असे असताना वीज भारनियमनामुळे पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे पिकासाठी पाण्याचा फेर मिटत नाही. यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना सहकार्य करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला.
उपसा कालावधीत वीजपुरवठा खंडित झाला तर त्याचदिवशी तेवढाच जादा वेळ वीजपुरवठा वाढवून देणे आवश्यक आहे; पण महावितरणकडून तसे घडत नसल्याने कृषिपंपाचा वीजपुरवठाच कमी मिळत आहे. कृषिपंपासाठी दिवसा व रात्री आठ तास मिळणारा वीजपुरवठा कमी दवाने मिळतो. त्यामुळे शेतीला आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.
वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे, जयशिवराय संघटनेचे शिवाजी माने, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, राजेंद्र सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, वैभव कांबळे, एस. ए. कुलकर्णी, सचिन जमदाडे, मारुती पाटील आदींनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला.
वीज बिलांची थकबाकी कमी करा
राज्यातील सर्व सहकारी पाणीपुरवठा संस्थांना एचटी व एलटी (उच्च दाब व लघुदाब उपसा पाणी सिंचन योजना) ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कृषिपंपाच्या वीज दरात सवलत दिली आहे. त्याची मुदत मार्च २०२४ पर्यंत आहे. तसा शासन निर्णय आहे. १.१६ पैसे प्रतियुनिट व स्थिर आकार २५ रुपये प्रती केव्ही इतकी सवलत आहे.
त्यानुसार सहकारी पाणीपुरवठा संस्थांनी भरावयाच्या सवलतीचा वीज दर १ रुपये प्रतियुनिट व स्थिर आकार १५ रुपये प्रती हॉर्स पॉवर प्रतिमहा इतकी सवलत आहे. त्यानुसार ज्या संस्थांनी विजेची बिले भरली आहेत, त्या ' संस्थांची थकबाकी कमी करावी, अशी मागणीही फेडरेशनने केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.