Rain Alert Agrowon
ताज्या बातम्या

Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा !

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येळो अलर्ट जारी केलाय.

टीम ॲग्रोवन

राज्यातील काही भागांत मंगळवारी हलका पाऊस (Rain) झाला. मात्र बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप कायम होती. मात्र हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येळो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केलाय.

कोकणात काही भागांत पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही मंडळात पावसानं हजेरी लावली. तर रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पाऊस कमी होता. तर काही ठिकाणी विजांसह पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात जवळपास सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाने हजेरी लावली. धरणक्षेत्रात हलक्या ते मध्यम सरी पडल्या. तर काही भागांत विजांसह मध्यम सरी पडल्या.

सोलापूर, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही मंडळांमध्ये पावसाचा जोर जास्त होता. तर बहुतांश भागांत हलक्या सरी झाल्या. मराठवाड्यातही ठिकठिकाणी हलक्या सरी झाल्या. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पावसाची भूरभूर सुरु होती. काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.

विदर्भातही काही जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर तुरळक ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. तसेच विदर्भातील बहुतांश भागांत पावसाचा शिडकावा पाहायला मिळाला. मात्र पावसाचा जोर कमीच होता. त्यामुळं अनेक भागांत ऊन पडले होते.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Farmer Schemes: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणार कमी कागदपत्रे ! डीबीटी पोर्टलवरील २१ योजनांचे डिजिटल सुसूत्रीकरण

Agricultural Mechanization Scheme: कृषी यंत्रे खरेदीसाठी सरकारकडून मिळतयं ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

MahaDBT Portal Subsidy: ‘महाडीबीटी’वरील बियाणे लॉटरीची प्रतीक्षा; आचारसंहितेमुळे प्रक्रिया रखडल्याने शेतकरी अडचणीत

Ghod Dam Electricity: घोड धरण परिसरात चार तास वीज द्या; आमदार ज्ञानेश्वर कटके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Banana Farming Losses: तीन एकरांतील केळीवर फिरविला ट्रॅक्टर; ३ लाख खर्च करूनही शेतकऱ्याच्या पदरी निराशा!

SCROLL FOR NEXT