APMC Election Maharashtra
APMC Election Maharashtra  Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra APMC Election : दुसऱ्या टप्प्यातही चुरशीने मतदान

Team Agrowon

Krushi Utpanna Bajar Samiti Elecetion :पहिल्या टप्प्यातील जोरदार चुरशीनंतर राज्यात दुसऱ्या टप्प्यातही ८८ कृषी उत्पन्न बाजार समित्यांकरिता रविवारी (ता.३०) तेवढ्याच उत्साहात ७० ते ९७ टक्के मतदान झाले.

मतदानानंतर ७८ बाजार समित्यांची मतमोजणी (Vote Counting) लगेचच सुरू झाल्या होत्या. मात्र, सायंकाळी ५ पर्यंत कोणतेही निकाल समोर आले नाही. पहिल्या टप्यातील १५ आणि दुसऱ्या टप्प्यातील १० अशा पंचवीस बाजार समित्यांसाठी आज (ता. १) मतमोजणी होत आहे.

राज्यातील २५३ बाजार समित्यांपैकी १८ बाजार समित्या बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित २५३ पैकी १४७ पहिल्या टप्प्यात, तर रविवारी दुसऱ्या टप्प्यातील ८८ बाजार समित्यांचे मतदान झाले.

पहिल्या टप्प्यातील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले. यामुळे दुसऱ्या टप्प्याकरिता सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे) युतीने जोर लावला आहे. संपूर्ण निकाल आज (ता.१) सायंकाळपर्यंत हाती येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात जुन्नर बाजार समितीसाठी ९७.६१ टक्के मतदान झाले. यामध्ये ३ हजार २६४ मतदारांपैकी ३ हजार १८६ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान सभापती ॲड. संजय काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेर पॅनेल निवडणूक लढवीत होते.

तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बंडखोर रघुनाथ लेंडे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे आणि शिंदे गट) आणि भाजप यांनी एकत्रित पॅनेल दिले होते. यामुळे या लढतीकडे जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.

नगर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील सात बाजार समित्यांसाठी रविवारी (ता.३०) उत्साहात मतदान झाले. चार वाजेपर्यंत शेवगाव, जामखेड, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, नेवासा बाजार समित्यांतील बहुतांशमध्ये ७० टक्क्यापर्यंत मतदान झाले. आज (ता.१) मतमोजणी होणार आहे. बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे.

सातारा जिल्ह्यातील आठ शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत चुरशी मतदान पार पडले. बहुतांशी बाजार समितीतीत ९० टक्के वर मतदान झाले आहे. यामध्ये सातारा ९३.८६, वाई ९०.५७, खंडाळा ९४.८२, फलटण ९२, कऱ्हाड ९७.१९, पाटण ९२.९२, खटाव ८९.७४, कोरेगाव ९५ टक्के मतदान झाले आहे. असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आज (सोमवार) मतमोजणी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री आणि गंगापूर बाजार समित्यांसाठी दुपारी दोन पर्यंत सुमारे ७९ टक्के मतदान झाले होते. तर मंठा (जालना) बाजार समितीमध्ये ९४.७८ टक्के मतदान झाले होते. जालना जिल्ह्यातील आष्टी बाजार समितीसाठी ९७.२८% मतदान झाले.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि दुधनी बाजार समितीसाठी रविवारी (ता. ३०) मतदान झाले. मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी सुरू झाली होती. दुपारी दोनपर्यंत जवळपास ८० टक्के पर्यंत मतदान झाले होते. सांगोला बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय नेते विरुद्ध कार्यकर्ते अशी लढत आहे.

तर दुधनीमध्ये माजी गृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या पॅनेलने आव्हान दिले आहे. मतदानवेळी सकाळी दोन्ही गटाकडून चिन्हाच्या प्रकारावरून शाब्दिक चकमकी झाल्या.

मनमाड (जि.नाशिक) बाजार समितीच्या १८ जागांसाठी रविवार मतदान झाले. येथे एकूण ९८.३५ टक्के मतदान झाले. मतमोजणीला लगेचच प्रारंभ करण्यात आला.

विदर्भात १७ समित्यांकरिता ९० टक्के मतदान

विदर्भातील ३९ बाजार समितीचे निकाल शनिवारी जाहीर झाले त्यानंतर रविवारी (ता.३०) देखील १७ बाजार समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, वरुड, दर्यापूर, अचलपूर व धारणी या सहा बाजार समित्यांचा समावेश आहे. शनिवारच्या निकालांमध्ये मतदारांनी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला होता.

त्यामुळे रविवारच्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीलाच बहुमताचा आकडा गाठता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उशिरापर्यंत निकाल हाती आले नव्हते. या निवडणुकांमध्ये सरासरी ९० टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, गडचिरोली,सावली बाजार समिती करता मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये देखील ९० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यात आठ बाजार समित्यांसाठी मतदान घेण्यात आले. या बाजार समितीतील १४४ जागांसाठी ३२४ उमेदवार रिंगणात होते. ९१३२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दारव्हा, बोरी अरब, कळम, जरी जामणी, मारेगाव, घाटंजी या बाजार समितीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tata Tea : ‘टाटा टी’कडून शेतकऱ्यांनी काय शिकायला हवे?

Indian Politics : पतंग, रेवड्या आणि वास्तव

Cotton Market : कापूस का काळवंडला?

Agriculture Commodity : मक्याच्या दरात घसरण; हळदीची पुन्हा उसळी

Kolhapur Market Rate : कोंथिबीर, पालेभाज्या २० रुपये पेंढी उष्म्यामुळे भाजी मंडईत आवक घटली

SCROLL FOR NEXT