Sugar Mill
Sugar Mill Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Mill : विठ्ठल साखर कारखाना सभा

टीम ॲग्रोवन

सोलापूर : ‘‘पंढरपूरसाठी नव्याने प्रस्थापित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी (एमआयडीसी)(MIDC) विठ्ठल साखर कारखान्याची (Vitthal Co-operative Society) ३६७ एकर जागा न विकता भाडेतत्त्वावर एमआयडीसीला देऊ.(Sugar Production) शेजारील शेतकरीही जागा देण्यास तयार आहेत.

साधारण एक हजार एकरपर्यंत जागा उपलब्ध होईल. त्यामुळे एमआयडीसीला विरोध होऊ नये,’’ असे मत विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केले. पंढरपुरातील विठ्ठल साखर कारखान्याची वार्षिक सभा चेअरमन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

त्या वेळी ते बोलत होते. कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रेमलता रोंगे, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी. पी. रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भोसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, प्रभारी कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘सभासदांच्या विश्‍वासामुळेच अवघ्या दोनच महिन्यांत कारखाना सुरू करणे शक्य झाले. आता यंदाच्या हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

या हंगामात ३१ हजार ५३२ एकर उसाची नोंद झाली आहे. पंढरपूरसह कार्यक्षेत्रातील अन्य १२ लाख १५ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल. गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन २५०० रुपये दर देण्यात येईल. कारखान्याचे संपूर्ण कामकाज संगणकीकृत आणि मोबाईल अॅपद्वारे सुरू करण्यात आले आहे.

लवकरच कारखान्यात इथेनॅाल प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे.’’ या वेळी कार्यकारी संचालक गायकवाड यांनी विषयाचे वाचन केले. काही सभासदांनीही या वेळी कारखान्याला काही सूचना केल्या.

‘साखरनिर्यातीचा कोटा वाढवा’

‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात कच्ची साखर आणि पांढऱ्या साखरेस मोठ्या प्रमाणात मागणी आहे. केंद्र शासनाकडून ५० ते ७५ लाख टनापर्यंत साखर निर्यात करण्याची केवळ परवानगी देण्यात येत आहे. पण त्याऐवजी १०० लाख टनांपर्यंत साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी, निर्यातीचा कोटा वाढविल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा आपल्याला फायदा घेता येईल,’’ असेही पाटील म्हणाले. या वेळी तसा ठरावही करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT