Water Conservation  Agrowon
ताज्या बातम्या

Water Conservation : गावतलावांचे होणार संवर्धन

Lake Conservation : गावशिवारात कधीकाळी पिण्याच्या पाण्याचा मुख्यस्त्रोत असलेल्या गावतलांच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

Team Agrowon

Amravati News : गावशिवारात कधीकाळी पिण्याच्या पाण्याचा मुख्यस्त्रोत असलेल्या गावतलांच्या संवर्धनासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत नवीन योजना प्रस्तावित केली आहे. गावांतील पूर्वीचे जलस्रोत विकसित करणे व त्याचे संवर्धन असा या योजनेचा उद्देश आहे.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नवनव्या योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून स्वच्छ पाणी घरपोच पोचविण्यावर भर दिला गेला आहे. ‘जलजीवन मिशन’ची देखील अंमलबजावणी त्या अंतर्गत होत आहे. असे असले तरी पूर्वीच्या काळी मात्र गावतलावच पिण्याच्या पाण्याचा मुख्यस्त्रोत होते.

त्यांच्या विकास आणि संवर्धनाकडे पुढे दुर्लक्ष झाले. परिणामी गावात जनावरांसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेची अडचण निर्माण होत गेली. दरवर्षी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. त्यामुळे शासनाने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गावतलावांच्या संवर्धन व विकासाची योजना प्रस्तावित केली आहे.

माहिती संकलनाला वेग

गावतलावांच्या संवर्धनासाठी अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाला जिल्ह्यातील गावतलावांची माहिती संकलित करून ती पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आठवडाभरात अशाप्रकारची माहिती देण्यात यावी, अशा सूचना आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून माहिती संकलनाच्या कामाला वेग देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT