Solapur Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Solapur Rain Update : सोलापूर जिल्ह्यातील ७१ मंडलांत अत्यंत कमी पाऊस

Latest Rain Update : यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील पीक सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल जवळपास ७१ मंडलात कमी पाऊस झाल्याचे सर्वेक्षणा दरम्यान आढळून असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पाऊस नसल्याने पिकांची वाढ थांबली आहे. ज्या मंडलात सलग २१ दिवस पाऊस पडला नाही, अशा मंडळातील पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले होते.

राज्य सरकारने जिल्ह्यातील पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांच्यासह कृषी विभागाची टीम जिल्ह्यातील पीक नुकसानीचे सर्वेक्षण करीत आहे.

सुरवातीला २१ दिवस पाऊस न पडलेल्या मंडळांची संख्या ३० होती, सर्वेक्षण सुरू करण्यात आल्यानंतर पुन्हा ३३ मंडलात पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान होत असल्याचे आढळले आहे. आता ही

संख्या ६३ मंडलापेक्षा अधिक झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील आणखी ७ मंडलात सलग २१ दिवस पाऊस नसल्याचे आढळून आले आहे. यामुळे आता कमी पावसच्या मंडलांची संख्या ७१ वर गेली आहे. ज्या भागात मंडलात पिकांचे सर्वेक्षण सुरू आहे, त्या भागातील पिकांचे अतोनात पावसाअभावी अतोनात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे.

सोयाबीन, उडीद, तूर, मूग, सोयाबीन या पिकांची वाढ पूर्णपणे थांबली आहे. अनेक ठिकाणी फुल गळती देखील झाली आहे. त्यामुळे आता पिकांचे उत्पादन येणे अशक्यच असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याची २५ टक्के ऍडव्हान्स रक्कम मिळवून देण्यासाठी पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

असा होतोय सर्व्हे...

सर्व्हेसाठी प्रत्येक मंडलीतील सह गावांची निवड करण्यात येते. एका गावातील दोन शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी सहायक विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थित पीक सर्व्हे घेण्यात येत आहे.

जिल्ह्यात १५ ठिकाणी टॅंकर सुरू

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीच फक्त तीन गावांमध्ये टॅंकर सुरू होते. मात्र, ऑगस्ट अखेरपर्यंतही संख्या १५ वर गेली आहे. सध्या माळशिरस तालुक्यात आठ, सांगोला तालुक्यात सहा टॅंकर सुरू असून मंगळवारी माढा तालुक्यातील तुळशी या गावात एक टॅंकर सुरू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT