Satara News Agrowon
ताज्या बातम्या

Vegetable Market : गटाराकडेला बसूनच भाजीपाला विकण्याची वेळ

बाजार आठवड्यातून दोन वेळा म्हणजे रविवार व गुरुवार या दोन दिवशी बाजार भरतो. त्यामुळे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणतात.

Team Agrowon

Karad News ः शेतातील पिकांसाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करायचे. घाम गाळून भाजीपाला-पालेभाज्या (Vegetable Market) पिकवायच्या. विक्रीची वेळ आली की त्या कऱ्हाडच्या (जि.सातारा) मंडईत घेऊन यायच्या. येथे आल्यावर जागा शोधण्याचा प्रयत्न केला की आमची ही जागा आहे.

आमची ती जागा आहे, असे त्यांना सुनावले जाते. जागेसाठी व्यापारी संकुलात तर शेतकऱ्यांना जागाच नाही. जागेसाठीच दोन-तीन तास खर्च करून गटाराकडेला जागा मिळाली की तेथेच शेतमाल विकत बसायचे.

दुर्गंधी येणाऱ्या जागेतच शेतकऱ्याला कष्टाने फुलवलेली भाजी विकण्याची वेळ जगाचा पोशिंदा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर येऊनही कऱ्हाड पालिकेकडून त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे, हे आश्चर्यच आहे.

बाजार आठवड्यातून दोन वेळा म्हणजे रविवार व गुरुवार या दोन दिवशी बाजार भरतो. त्यामुळे शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणतात. मात्र शेतकरी भाजी घेवुन बाजारात आल्यावर त्याला भाजी विकण्यासाठी रस्त्यावरच बसावे लागते.

तर जे भाजी विक्रेता व्यापारी आहेत ते शेतकऱ्यांना बांधलेल्या इमारतीत बस्तान बांधून बसले आहेत. त्यामुळे पालिकेने मंडईसाठी कोट्यवधींचा खर्च घालून बांधलेल्या इमारतीचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही.

पालिकेने काही वर्षांपूर्वी येथे भाजी मंडईची सुसज्ज इमारत उभी केली. त्यात शेतकऱ्यांची व विक्रेत्यांची सोय करण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात त्या वास्तूत काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी सुरू आहे.

पालिका आवारातील बाजार बंदच

सदाभाऊ खोत हे कृषी राज्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाडच्या मंडईतील व्यापाऱ्यांची दयनीय अवस्था पासून त्यांनी शेतकऱ्यांना पालिकेच्या आवारात भाजीपाला-पालेभाज्या विक्रीसाठी बसवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तत्कालीन मुख्याधिकारी यांनी तेथे शेतकऱ्यांना परवानगी दिली होती. मात्र केवळ दोनच बाजार तेथे भरले. मात्र शेतकरी पुन्हा रस्त्यावर आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी

Farmer Innovation: शेतकऱ्यांच्या कल्पकतेला शाबासकीची थाप

War Impact on Agri: युद्धामुळे खतांच्या किंमती वाढणार?

Ahilyanagar ZP Budget: अहिल्यानगर झेडपीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी चार कोटी

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

SCROLL FOR NEXT