Shasan Aply Dari Agrowon
ताज्या बातम्या

Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ अभियानात विविध दाखल्यांचे वाटप

Government Scheme : विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूरच्या वतीने कासेगांव येथे शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूरच्या वतीने कासेगांव येथे शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत ११९ विविध दाखल्यांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले असल्याचे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, दक्षिण सोलापूरच्या वतीने कासेगाव येथे महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास गटविकास अधिकारी शीतल बुलबुले, तालुका पशुधन विकास अधिकारी श्री. जाधव, नायब तहसीलदार दत्तात्रेय गायकवाड, नायब तहसीलदार आरती दाबाडे, कासेगाव विकास मंचचे यशपाल वाडकर, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

शासनाची नागरिकांना दस्तऐवज उपलब्ध करून देणारी ही कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते.

काही वेळा अनेक लोकांना शासनाकडून त्यांना देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्णपणे सफल होत नाही, यासाठी शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान सुरू केले असल्याचे तहसीलदार लिंबारे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दाखल्यांसह पाच विहिरींसाठी कार्यारंभ आदेश

महसूल विभागाच्या वतीने एकूण ६३ उत्पन्नाचे दाखले, १६ जातीचे दाखले, ७ नॉन क्रिमीलेअर दाखले, ८ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दाखले, २५ रहिवासी दाखले वितरण करण्यात आले. या अभियानात एकूण ११९ दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच महाराष्ट्र महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाच लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचा कार्यारंभ आदेश देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

Indian Politics: देशात पैसा, तंत्रज्ञान भरपूर; पण कमतरता इमानदारांची: नितीन गडकरी

Gorakshak Terror: गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?

Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा अर्जासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

SCROLL FOR NEXT