Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : 'सर्व जनावरांची लसीकरण पूर्ण करणार'

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः जिल्ह्यात लम्पी स्कीनचा धोका (Lumpy Skin Outbreak) कमी करण्यासाठी आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वसुबारसपर्यंत सर्व जनावरांची तपासणी आणि लसीकरण (Lumpy Skin Vaccination) पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

श्री. स्वामी यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केली. या बैठकीला सहायक पशुसवंर्धन अधिकारी डॉ. भास्कर पराडे, पशुधन अधिकारी बोरकर उपस्थित होते. श्री. स्वामी म्हणाले, की आतापर्यंत १३२६ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली आहे. त्यापैकी ४७४ जनावरे बरी झालेली आहेत. एकूण ६२ जनावरांचा मृत्यू झाला असून, ७९० जनावरांवर उपचार सुरु आहेत. साखर कारखान्यांनी त्यांच्या स्तरावर संपर्क अधिकारी नेमण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

कारखाना परिसरात नव्याने दाखल होणाऱ्या बैल व गाय वर्गीय जनावरांची माहिती तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. आज अखेर सहा लाख ९८ हजार ११९ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. दीपावली बसूबारसच्या पार्श्वभूमीवर तपासणी व लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असून बसू बारस पर्यंत शंभरटक्के लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

पशुपालकांना मदतीचे वाटप

जिल्ह्यात लम्पीमुळे मृत्यू झालेल्या ३१ जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यामध्ये उत्तर सोलापूरमधील पाच, सांगोला पाच, करमाळा नऊ, माळशिरस आठ, पंढरपूर तीन आणि माढ्यातील एक या प्रमाणे प्रत्येकी एका पशुपालकांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. साधारण एकूण आठ लाख १५ हजार रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

Agrowon Podcast : कापूस भाव स्थिरावले ; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच आल्याचा काय आहे दर ?

Animal Treatment : दररोज ३०-४० जनावरांवर उपचार बंधनकारक

Kharif Season : खरिपात वाढणार सोयाबीन, कपाशी क्षेत्र

SCROLL FOR NEXT