औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघू मध्यम मोठ्या प्रकल्पांसह (Marathwada Irrigation Project) विविध नद्यांवरील बंधारांमधील उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ११ मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा (Useful Water Stock) नव्वद टक्क्यांवर पोहोचला असताना बहुतांश माध्यम व लघू प्रकल्पाची तहान मात्र अजूनही कायम आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी येलदरी, सिद्धेश्वर, ऊर्ध्व पेनगंगा, निम्नतेरणा, निम्नमनार, विष्णुपुरी या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा नव्वद टक्क्यांपुढे गेला आहे. सिद्धेश्वर व जायकवाडी प्रकल्प तुडुंब होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. माजलगाव प्रकल्पात ६० टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ७० टक्के व मांजरा प्रकल्पात ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. एकीकडे दहा मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात उपयुक्त पाणीसाठा झाला असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील सीना कोळेगाव प्रकल्पात मात्र केवळ १९ टक्के उपयुक्त पाणी साठले गेले असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
औरंगाबादमधील मध्यम प्रकल्पात सर्वांत कमी पाणीसाठा
औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी केवळ ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जालना जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात ५६ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पांत ६६ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात ८४ टक्के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पात ७३ टक्के, परभणीतील २ प्रकल्पात ८७ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात सर्वाधिक ९९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
नांदेडमधील लघू प्रकल्प तुडुंब
मराठवाड्यातील ७४७ लघू प्रकल्पांत ६० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ८० लघू प्रकल्प तुडुंब झाले आहेत. त्या पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत ९८ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ८१ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत ७५ टक्के, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पांत ५२ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ४७ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ४३ टक्के, तर औरंगाबादमधील ९७ प्रकल्पांत सर्वांत कमी ३५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.