Green fodder Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Shortage : हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे उसावर कोयता

Green Fodder : ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने यावर्षी जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे.

Team Agrowon

Pandharpur News : ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस न पडल्याने यावर्षी जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची टंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. मका, कडवळ हा हिरवा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने पशुपालक नाइलाजास्तव ऊस पिकाचा वापर चारा म्हणून करत आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील वैरण बाजारामध्ये उसाची आवक वाढली असून, ऊस खरेदीसाठी पशुपालकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पंढरपूर तालुका हा जवळपास १०० टक्के बागायती असल्यामुळे पशुपालकांनी दूध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर पशुधन जोपासले आहे.

तालुक्यामध्ये सुमारे ८९ हजार म्हशी तर ९१ हजार गाई असे एकूण एक लाख ८० हजार पशुधनाची संख्या आहे. हे पशुधन जोपासण्यासाठी हिरवा चाराही तितक्याच मोठ्या प्रमाणावर लागतो.

माझा पाच एकर ऊस आहे. हिरव्या चाऱ्यासाठी उसाला टनाला तीन हजार २०० रुपये भाव मिळत आहे. पाण्याअभावी ऊस जळून जाण्यापेक्षा पशुपालकांना उसाची विक्री करीत आहे.
- धनाजी देशमुख, ऊस बागायतदार, कासेगाव
माझ्याकडे २० पंढरपुरी म्हशी आहेत. आवक कमी झाल्यामुळे मका,कडवळ या हिरव्या चाऱ्याचा दर प्रतिटन साडेचार ते पाच हजारांपर्यंत झाला आहे. त्यामुळे नाइलाजास्तव उसाची खरेदी करावी लागत आहे.
- गोविंदा औसेकर, पंढरपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Price: सणासुदीमुळे दूध खरेदी दर तेजीत राहण्याची शक्यता

Ajit Pawar: ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये जिल्हा प्रथम यावा: अजित पवार

Agriculture GST Reform: अन्नप्रक्रिया, कृषी उद्योगातून निर्णयाचे स्वागत

BSC Agriculture Admission: कृषी शिक्षणाकडे कल वाढला

Talathi Laptop Purchase: तलाठ्यांना मिळणार ९४ कोटींचे लॅपटॉप

SCROLL FOR NEXT