Urea Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Stock : जळगाव जिल्ह्यात युरियाचा तुटवडा वाढला

Urea Shortage Jalgaon : जिल्ह्यात या हंगामात सुरुवातीपासून खतांची टंचाई असून, युरिया मिळणे दुरापास्त झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात या हंगामात सुरुवातीपासून खतांची टंचाई असून, युरिया मिळणे दुरापास्त झाले आहे. जळगाव शहर, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, यावल, पारोळा, अमळनेर आदी भागांत कुठेही युरिया मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकांना खते देताना अडचण येत आहे.

जळगाव शहर, चोपडा व इतर भागांत काही विक्रेते फक्त मर्जीतील खरेदीदार किंवा मोठ्या शेतकऱ्यांनाच आपल्याकडील साठ्यातून युरिया देत आहेत. त्यात चार गोण्यांमागे एक नॅनो युरियाची अर्धा लिटरची २४० रुपयांची बाटली देत आहेत.

तसेच इतर मिश्र, विद्राव्य खतांची लिकिंगही केली जात आहे. यामुळे शेतकरी जेरीस आले असून, कृषी विभागाकडून कुठेही कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कृषी विभागाने तक्रारीसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केला आहे. पण त्याचा किती उपयोग शेतकऱ्यांसाठी होत आहे, हादेखील प्रश्‍न आहे. कृषी विभाग लेखी तक्रारीची प्रतीक्षा करीत आहे. याबाबत एका शेतकऱ्याने आपला वाईट अनुभव ‘अॅग्रोवन’ला सांगितला.

१०.२६.२६ खताच्या तीन गोण्या व युरियाच्या फक्त दोन गोण्या हव्या होत्या. त्यासाठी जळगाव शहरातील एका खत विक्रेत्याकडे विचारणा केली. त्यांनी युरियाच नाही. नॅनो घ्या, दाणेदार स्वरूपातील युरिया १० दिवसांनंतर येईल. कुठेही युरिया येणार नाही. माझ्याकडे आता फक्त १५ गोण्या युरिया आहे. त्याची देखील विक्री झाली आहे, असे विक्रेत्याने सांगून परत पाठविले. असाच प्रकार इतर भागांतही जिल्ह्यात सुरू आहे.

जळगाव संवेदनशील, पण सर्वच बेफिकीर

जळगाव खते व कापूस बियाण्याच्या बाबतीत संवेदनशील म्हणून ओळखले जाते. परंतु जिल्ह्यात खतपुरवठा विस्कळीत आहे. मागील वर्षीदेखील मोठी टंचाई होती. यंदाही ऐन पीकवाढीच्या काळात किंवा हंगामात टंचाई आहे.

फक्त मोठ्या, काही मर्जीतल्या शेतकऱ्यांना खतपुरवठा विक्रेते व्यवस्थित करतात. पण इतरांचाही किंवा ज्यांना दोन-तीन गोण्या हव्या असतात, त्यांनाही खतपुरवठा करा, कृषी विभागाने या प्रकारास गांभीर्याने घ्यावे, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सरकारकडे दाखवितात बोट

खत कंपन्या युरियाचे उत्पादन करीत नसल्याची स्थिती आहे. कारण त्यांना केंद्र सरकारकडून देय अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यांना ज्या वेळी अनुदान मिळेल, त्या वेळी कंपन्या युरियाचे उत्पादन व पुरवठा करतील. यासाठी किमान १० दिवस वेळ लागेल, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT