APMC Agrowon
ताज्या बातम्या

APMC : नामपूर बाजार समितीच्या सभेत गदारोळ

सुमारे पाच तास चाललेल्या सभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सरबत्तीमुळे गदारोळ निर्माण झाला होता.

टीम ॲग्रोवन

नामपूर, ता. सटाणा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Satana) शुक्रवारी (ता. ३०) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अवाजवी खर्चाच्या अनेक मुद्द्यांवरून संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. सभापती कृष्णा भामरे (Krushna Bhamre) अध्यक्षस्थानी होते.

पहिल्यांदा सुमारे पाच तास चाललेल्या सभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सरबत्तीमुळे गदारोळ निर्माण झाला होता.सचिव संतोष गायकवाड यांनी मागील इतिवृत्त, आर्थिक पत्रकांचे वाचन केले. गेल्या आर्थिक वर्षात बाजार समितीला ५ कोटी २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून २ कोटी ४४ लाख रुपये खर्च झाल्याने संस्थेला २ कोटी ८० लाख हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे.

संस्थेला ‘अ’ लेखापरीक्षण वर्ग मिळाला आहे. उपसभापती लक्ष्मण पवार, संचालक संजय भामरे, भाऊसाहेब अहिरे, भाऊसाहेब भामरे, शांताराम निकम, आनंदा मोरे, भाऊसाहेब कांदळकर, अविनाश सावंत, डी. डी. खैरनार, दीपक पगार, मधुकर चौधरी, चारुशिला बोरसे, चंद्रभागाबाई शिंदे, सचिन मुथा, अविनाश निकम, दत्तू बोरसे या वेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजार समित्या असताना शेतकऱ्यांना सुविधा देण्याऐवजी व्यापाऱ्यांना चहापानासह इतर बाबींवर खर्च केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून रोष दिसून आला. या वेळी माजी सरपंच जगदीश सावंत, प्रवीण सावंत, द्याने येथील उपसरपंच के. पी. कापडणीस, दीपक सावंत,

शेतकरी संघटनेचे शैलेंद्र कापडणीस, अरुण वाघ, प्रवीण अहिरे, बिपिन सावंत, शशिकांत कोर, भाऊसाहेब कापडणीस, संतोष पगार, विजय अहिरे, मधुकर कापडणीस, नकुल सावंत, सचिन सावंत, दीपक भामरे, विनोद पाटील, किरण आहेर आदींनी चर्चेत भाग घेतला. सचिव संतोष गायकवाड यांनी आभार मानले.

शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या

कांद्याच्या लिलावानंतर होणारी वांदा पद्धत बंद करावी.

बाजार समिती आवारात काँक्रिटीकरण करावे.

नवीन प्रशासकीय इमारत तातडीने कार्यान्वित करावी.

नवीन भाजीपाला मार्केट सुरू करावे.

शेतकरी नेते शरद जोशी यांचा पुतळा बसवण्यात यावा.

नोकरभरतीची चौकशी करण्यात यावी.

शेतकरी निवारा केंद्र सुरू करावे.

मागील काळातील शेतकरी बांधवांचे व्यापाऱ्याकडे अडकलेले पैसे त्वरित देण्यात यावेत.

लिलावाप्रसंगी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे.

नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाची चौकशी करावी.

कांदा व्यापाऱ्यांकडे असणाऱ्या वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करावी.

नामपूर बाजार समितीच्या आवारात ३ कोटी ६३ लाख रुपयांच्या विनियोगातून पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम सुरू असून नळकस रस्त्यालगत कांदा लिलाव आवारात सुमारे ४० हजार चौरस फूट जागेत ३ कोटी ८० लाख रुपयांच्या विनियोगातून भव्य लिलाव शेड उभारण्यात येणार आहे.

करंजाड उपबाजार आवारात सुमारे दीड कोटी रुपयांचे संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. पणन संचालकाच्या परवानगीने बाजार समितीच्या आवारात विकासकामे करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे. - कृष्णा भामरे, सभापती नामपूर बाजार समिती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Protest : बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेते उद्या मुख्यमंत्र्यांशी मुंबईत करणार चर्चा; आंदोलन मात्र सुरुच राहणार

Farmer Loan Waiver : कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांना फोन करा; बच्चू कडूसह शेतकरी नेत्यांची शिष्टमंडळाकडे मागणी

Bacchu Kadu Live : न्यायालयाच्या आदेशानंतर बच्चू कडू अटक करून घेण्यासाठी पोलिसांकडे निघाले; आंदोलनावर मात्र ठाम

Farmer Compensation: भरपाईची रक्कम अन्य खात्यात वळविल्यास कारवाई

Kukadi Project: हिरडगावात कुकडी चारी दुरुस्तीला शेतकऱ्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT