Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Nagar Unseasonal Rain : नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच

नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. शुक्रवारी (ता.२८) दिवसभरात दोन वेळा पाऊस कोसळला.

Team Agrowon

Nagar News जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचा धुमाकूळ (Unseasonal Rain) सुरूच आहे. शुक्रवारी (ता.२८) दिवसभरात दोन वेळा पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीट (Hailstorm) होत आहे. सततच्या पावसाने पिकांची हानी सुरू आहे.

नगर, राहाता, नेवासा, पारनेर, राहुरी, शेवगाव, कोपरगाव, संगमनेर तालुक्याला शुक्रवारी पावसाने तडाखा बसला. म्हसले (ता. नेवासा) येथे वीज पडून एका दहा वर्षीय मुलाचा, तर जामखेड तालुक्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

पुणतांबे, रस्तापूर परिसराला शनिवारी पावसाने झोडपून काढले. शेवगाव तालुक्यातही पावसाचे सत्रही सुरूच आहे. शहरटाकळी परिसरात रब्बी बाजरी, मका, ज्वारी, कांदा, सोयाबीन, आंबा, डाळिंब पिकांचे नुकसान झाले. नई, गणेशवाडी,

हनुमानवाडी, बेल्हेकरवाडी भागांत नुकसान झाले. म्हसले (ता. नेवासे) येथे वीज पडून साई राजेंद्र शिरसाट (वय १०) हा याचा मृत्यू झाला. पाचेगाव, पुनतगाव भागात शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.

महिन्यात २० हजार हेक्टरचे नुकसान

जिल्ह्यात पाऊस, वादळ आणि गारपिटीने गेल्या महिनाभरात सुमारे २० हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी अनेक भागांत वादळी पाऊस कोसळला.

राहाता तालुक्यातील खडकेवाके आणि पिंपळस परिसरातील बागायत शेतीची निसर्गाच्या तांडवाने अवघ्या २० मिनिटांत धूळधाण केली. वादळाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले. घरांचे पत्रे उडाले. विजेचे खांब वाकले. काढणीला आलेला कांदा भिजला आणि झाडे उन्मळून पडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT