Hailstorm Nashik Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Hailstorm News : नाशिकला वादळी पावसासह गारपिटीने पुन्हा हाहाकार

एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून वादळी पावसासह व गारपिटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधीच आर्थिक कंबरडे मोडले आहे.

Team Agrowon

Nashik News एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहापासून वादळी पावसासह व गारपिटीने (Hailstorm) जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधीच आर्थिक कंबरडे मोडले आहे. अशातच पुन्हा एकदा शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी सटाणा, निफाड, मालेगाव व सिन्नर या तालुक्यांत विविध भागांत वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे (Natural Calamity) हाहाकार झाला आहे.

सिन्नर तालुक्याच्या दक्षिण भागात नांदूर शिंगोटे परिसरात शुक्रवारी वादळी पावसाने आठवडे बाजारला झोडपले. पावसाचा जोर वाढल्यामुळे कांदा पोळी झाकल्या गेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना परत नुकसानीचा सामना करावा लागला.

सटाणा तालुक्यात उत्तर भागात कातरवेल, राजापूर, नवे पिंपळकोठे, भडाणे, दरेगाव, नांदीन, तांदूळवाडी, दसवेल, अंतापूर, ताहाराबाद येथे जोरदार वाऱ्याच्या पावसासह गारपीट झाली. त्यामुळे डाळिंब, द्राक्ष कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे डाळिंबाचा बहर गळून गेला.

निफाड तालुक्यात विंचूरला कांद्याचे शेड जमीनदोस्त झाले. टाकळी विंचूर येथील कांदा उत्पादक शेतकरी दत्तात्रेय पवार शेड जमीनदोस्त झाले. परिसरात बेदाणा पावसात भिजल्याने तो फेकून देण्याची वेळ आली आहे.

कळवण तालुक्यातील अभोणा, बार्डे, रवळजी परिसरात जोरदार पाऊस झाला. शेतातील कांदा भिजला. मिरची, टोमॅटोचे उन्हाळी बाजरीचे मोठे नुकसान झाले. मोहनदरी येथील पार्वताबाई चव्हाण यांच्या शेतातील पोल्ट्री फार्म शेडचे मोठे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात कांद्याचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यातील नुकसान असे...

- फोपशी (ता. दिंडोरी) येथे तीन घरांवरील पत्रे उडून पडझड

- मोहनदरी(ता. कळवण) येथे पोल्ट्री फार्म शेडचे मोठे नुकसान

- कळवण तालुक्यात विद्युत खांबांसह झाडे उन्मळून पडली

- विंचूर परिसरात कांद्याचे शेड भुईसपाट

- साजवहाळ (ता. मालेगाव) जिल्हा परिषद शाळेतील कार्यालयाचे पत्रे उडाले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: जमीन खरडून गेलेल्यांना सरसकट दिलासा नाहीच

FPC Loan Proposal: ‘एफपीसीं’चे कर्जप्रस्ताव बॅंकांनी रखडवले

Soybean Price: हमीभावापेक्षा ११२८ ते १७२८ रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी

Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

SCROLL FOR NEXT