Jal Jeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jal Jeevan Mission : ‘जल जीवन’अंतर्गत जिल्ह्यातील ७८ गावे ‘हर घर जल’ घोषित

Water Scheme : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के नळजोडणी झालेल्या गावामधील ७८ गावांना ‘हर घर जल’ घोषित करण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ३३० ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के नळजोडणी झालेल्या गावामधील ७८ गावांना ‘हर घर जल’ घोषित करण्यात आले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रति व्यक्ती, प्रतिदिन ५५ लीटर शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हा उद्देश आहे.

सध्या जिल्ह्यातील ८५५ गावात जल जीवन मिशन अंतर्गत योजनेची कामे सुरु आहेत. यामधील २४ गावातील योजना पूर्ण झाल्या असून, ३३० ग्रामपंचायतींमध्ये १०० टक्के नळजोडणी आहे.

यामधील ७८ गावे ग्रामसभा घेऊन हर घर जल घोषित केली आहेत. सदर गावांची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन करण्यात आलेली आहेत. तसेच उर्वरित गावातील प्रत्येक कुटुंबाला १०० टक्के नळजोडणी पूर्ण होत आहे.

त्यांना सुद्धा हर घर जल म्हणून घोषित करून ती गावे संकेतस्थळावर ऑनलाइन करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी गावात जल जीवन मिशनचे काम दर्जेदार करून घ्यावे, गावातली प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पुरेसे आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा. गावे हर घर जल घोषित करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले आहे.

हरघर जल घोषित गावे

जिल्ह्यात १०० टक्के नळजोडणी झालेल्या ग्रामपंचायतीमधील हर घर जल घोषित झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती याप्रमाणे ः अक्कलकोट- बऱ्हाणपूर, बोरेगाव, चपळगाव, चपळगाववाडी, दर्शनाळ, हन्नूर, कुडाळ, बार्शी-बेलगाव, चुंब, गोरमाळे, कासारवाडी, काटेगाव, खांडवी,

पांढरी, तुळशीदास नगर, करमाळा - आवाटी, बाळेवाडी, बिटरगाव वां., देवळाली, ढोकरी, कविटगाव, केडगाव, कुगाव, लव्हे, रिटेवाडी, सांगवी, सरपडोह, सातोली, शेटफळ, सोगाव, सौंदे, वांगी, वरकुटे, माढा-आढेगाव,

अकुलगाव, आलेगाव बु., अंबड, भोगेवाडी, भोगेवाडी चाखले, बिटरगाव, फुटजवळगाव, घाटणे, कव्हे, लऊळ, लोणी, लोणीनाडी, म्हैसगाव, मुंगशी, पापनस, पिंपळखुटे, रोपळे खु., शिंगेवाडी, सुर्ली, उजनी टें.,

माळशिरस-बिजवडी, फडतरी, गणेशगाव, गारवाड, नेवरे, संग्रामनगर, तरंगफळ, मंगळवेढा-हाजापूर, खोमनाळ, सिद्धापूर, मोहोळ - घाटणे, अर्जुनसोंड, औंढी, काटेवाडी, लांबोटी, मलिकपेठ, दाहिंगडेवाडी, पंढरपूर- मगरवाडी, सांगोला - कमलापूर, किडबिसरी, सोमेवाडी, तिप्पेहळ्ळी, दक्षिण सोलापूर-दिंडूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad elections: अहिल्यानगर ‘झेडपी’ची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Crop Loan: किसान क्रेडिट कार्डचे एक हजार पीककर्ज प्रस्ताव मंजूर करा: जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

SCROLL FOR NEXT