Udhhav Thackeray Agrowon
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : आम्हाला आत्महत्या करायला लावू नका..! ; शेतकऱ्याची ठाकरेंसमोर आर्त हाक

"बांधवांनो धीर सोडू नका. आपलं सरकार असताना मदत पोहचत होती. मात्र आताच्या सरकारलाही मदत पोहचवायला भाग पाडू. तुम्ही धीर सोडू नका. अशा शब्दात ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला."

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आज (२३ ऑक्टो.) औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसात परतीच्या पावासमुळे (Rainfall) मराठवाड्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Crop Damage) झाले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची ठाकरे यांनी पाहणी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी संकटग्रस्त शेतकऱ्यांची भेट (Udhhav Thackeray Meet Farmers) घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

औरंगाबाद येथे पोहचल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. शेतकरी बांधव ठाकरेंना म्हणाले की, "साहेब.. बँकेचा तगादा आहे. पण, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आम्ही हवालदिल झालो आहोत, काहीतरी करा साहेब.मदत करा, कर्ज माफ करा, आम्हाला आत्महत्या करायला लावू नका, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.

यावर ठाकरे म्हणाले की, "बांधवांनो धीर सोडू नका. आपलं सरकार असताना मदत पोहचत होती. मात्र आताच्या सरकारलाही मदत पोहचवायला भाग पाडू. तुम्ही धीर सोडू नका. अशा शब्दात ठाकरेंनी शेतकऱ्यांना धीर दिला."

नुकसानीच्या पाहणीनंतर ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, "खऱ्या अर्थाने कोरोनाच्या संकटकाळात शेतीने आणि शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था सांभाळली. आताचं सरकार हे 'उत्सवी' सरकार आहे, मात्र अतिवृष्टीच्या संकटात शेततकऱ्यांचं दिवाळं निघालंय. शेतकऱ्यांना हेक्टरी ५०००० रूपये मदत मिळाली पाहिजे. ही शेतकऱ्यांची मागणी, आणि या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे."

दरम्यान, शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहचवा. नाहीतर शेतकरी बरबाद होईल. सरकारने जाहीर केलेला शिधाही लोकांपर्यंत पोहचत नाही. मात्र शिधासुद्धा शेतकऱ्यांकडूनच येतो एवढं लक्षात ठेवा.अशा संकटाच्या काळात आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना उघड्यावर पाडू नका. पाझर फुटत नसेल तर सरकारला घाम फोडा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT