Pawar-Thackeray Meeting  Agrowon
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray Meets Sharad Pawar at Silver Oak : पवार-ठाकरे यांची जागा वाटपावर खलबते

India Alliance Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ही बैठक झाली. ही बैठक सुमारे ९० मिनिटे चालली.

Swapnil Shinde

Uddhav Thackeray and Sanjay Raut Meets Sharad Pawar : दिल्लीत होणाऱ्या आगामी ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दीड तास बैठक झाली. महाराष्ट्रातील दुष्काळ, लोकसभा निवडणुकीचे जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबईत १ सप्टेंबर रोजी ‘इंडिया’ आघाडीची बैठक झााली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात आली होती. मात्र, दिल्लीत होणाऱ्या बैठकीत या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्यातील जागावाटपासंदर्भातील अंतिम बोलणी करण्यासंदर्भात पवार आणि ठाकरे यांच्यात बैठक झाल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी दुपारी ठाकरे यांनी पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. दीड तासांच्या या बैठकीत खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

१४ सप्टेंबरपासून शिवसेनेतील फुटीवर सुनावणी सुरू होणार आहे. यासाठी ठाकरे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी नोटिसा पाठविल्या असून, एकेका आमदाराची सुनावणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच राष्ट्रवादीनेही आपल्या फुटीर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा घेत विधानसभा आणि विधान परिषदेत याचिका दाखल केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT