Pomegranate Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate Theft : दोन टन डाळिंबावर चोरट्यांकडून डल्ला

Dalimba Stolen : शेतकऱ्याचे अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाले असून चोरीमुळे डाळिंब उत्पादकांत घबराट निर्माण झाली असल्याने रात्री जागता पहारा देत आहेत.

Team Agrowon

Satana News : सटाणा तालुक्यातील इजमाने येथे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या बागेतील विक्रीसाठी तयार झालेल्या डाळिंबावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना शनिवारी (ता. २२) रात्रीतून घडली. त्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे अडीच लाखांचे नुकसान झाले असून चोरीमुळे डाळिंब उत्पादकांत घबराट निर्माण झाली असल्याने रात्री जागता पहारा देत आहेत.

येथील गट क्रमांक ६९२/२ मधील नामपूर शिवारात लोटन रामजी धोंडगे यांनी दोन एकर क्षेत्रात डाळिंब लागवड केली असून डाळिंबावर कीडनाशकांसह खतांची मात्रा देऊन डाळिंब बाग तयार केली आहे.

अनेक दिवसांपासून रात्रीचा दिवस करीत तयार डाळिंबावर चोरट्यांची नजर गेली आणि रात्री चोरट्यांनी डाळिंब बागेत अंदाजे दोन ते अडीच टन डाळिंब गोणीत भरून पोबारा केला.

सकाळी कुटुंबातील सदस्य डाळिंब उत्पादक शेतकरी धनराज धोंडगे हे डाळिंब बागेत फेरफटका मारण्यासाठी गेले असता ही घटना उघडकीस आली. डाळिंब चोरीची ही दुसरी घटना आहे. या अगोदर मालेगाव तालुक्यातील सातमाने येथेही अशाच प्रकार चोरी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj: आज, उद्या पावसाची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता

Okra Farming: भेंडी पीक काढणीला गती; शिवार खरेदीत २५ रुपयांपर्यंत दर

Grain Drying: धान्य वाळविण्यासाठी काळ्या रंगाची ताडपत्री फायदेशीर

Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बच्चू कडू यांची उद्यापासून राज्यभर शेतकरी संवाद यात्रा

Maize Crop Loss: सलग पावसामुळे मक्याचा चारा कुजला

SCROLL FOR NEXT