Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Irrigation : दोन महिन्यांत वीस टीएमसी पाण्याचा वापर

रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांत जवळपास १९.९८ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी (Water Department) करण्यात येत आहे. गेल्या दोन महिन्यांत जवळपास १९.९८ टीएमसी पाण्याचा वापर (Water Consumption) झाला आहे. सध्या जिल्ह्यातील २६ धरणांत एकूण १८२.६९ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा (Water Stock) शिल्लक आहे.

येत्या काळात पाण्याची मागणी वाढल्यानंतर साठ्यात आणखी घट होणार आहे. उन्हाळ्यात घरगुती वापर व शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्यासाठी जलसंपदा विभागाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांत २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यातच परतीच्या पावसानेही चांगलीच दाणादाण उडवल्याने धरणांतील पाणीपातळीत पुन्हा काही प्रमाणात वाढ झाली होती. मुठा खोऱ्यातील टेमघर, खडकवासला या धरणांतील पाणीसाठा कमी-अधिक असून, वरसगाव, पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली होती.

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, वडिवळे वगळता कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर ही धरणे शंभर टक्के भरली होती. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह वगळता येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड ही धरणेसुद्धा शंभर टक्के भरली होती. मुळशी, विसापूर या धरणांत शंभर टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, उजनी धरणांत शंभर टक्क्यांहून अधिक म्हणजेच १११ टक्के पाणीसाठा झाला होता.

पश्‍चिम पट्ट्यात असलेल्या धरणातून पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. याशिवाय पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांनाही या धरणांतूनही पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान, येडगाव, डिंभे, उजनी या धरणांतून रब्बी हंगामासाठी कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

यामध्ये खडकवासला धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला १४९४ क्युसेक, चासकमानमधून ४५० क्युसेक, येडगाव ५००, डिंभे ८३०, उजनीतून ९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे.

धरणनिहाय असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये :

टेमघर १.९८, वरसगाव ११.६४, पानशेत ९.७४, खडकवासला १.१९, पवना ६.५१, कासारसाई ०.४७, कळमोडी १.४९, चासकमान ६.८६, भामा आसखेड ६.६१, आंद्रा २.५९, शेटफळ ०.५९, नाझरे ०.५६, गुंजवणी ३.५१, भाटघर २२.६४, नीरा देवघर ११.५५, वीर ४.६०, पिंपळगाव जोगे ३.२२, माणिकडोह ८.८४, येडगाव १.९४, वडज १.०७, डिंभे ११.५२, चिल्हेवाडी ०.७९, घोड ४.६६, विसापूर ०.८८, उजनी ५६.२७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT