Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : यवतमाळ जिल्ह्यात वीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित

पंचनामे अंतिम टप्प्यात, नुकसानग्रस्तांना मदतीची गरज

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. अतिवृष्टीची (Wet drought) मदत शासनाने जाहीर केल्याने आता शेतकऱ्‍यांना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा (Crop Insurance) कंपनीकडून मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना आधार मिळेल.

यंदा अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्‍यांना करावा लागला. जुलै व ऑगस्ट या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत पावसाने हजेरी लावली. परतीच्या पावसाने शेतकऱ्‍यांसमोरील अडचणी वाढविल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरपर्यंत जाण्याचा धोका वाढला आहे.

कृषी विभागाने तसा अंदाज वर्तविला आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. पावसाने मोठ्या प्रमाणावर पीक क्षेत्र बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे. आता शेतकऱ्यांच्या सर्व नजरा पीकविमा कंपनीकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.

सोयाबीन निघेना, कापूसही घरी पोहोचेना
अतिवृष्टी व सततच्या पावसापेक्षा मोठे नुकसान परतीच्या पावसाने केले. पाऊस लांबल्याने अजूनही सोयाबीन निघालेले नाही. कापूसही शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही. एका मागून एक संकट येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासन आता परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. परतीच्या पावसाने २० हजार हेक्टरच्या जवळपास नुकसानीचा अंदाज आहे. पंचनामे करून शासनाला माहिती पाठविली जाईल.
- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Well Repair GR : विहिरींच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर; १५ हजार रुपये अग्रीम जमा होणार

Residue Cotton Management: फरदड न घेता त्याऐवजी पऱ्हाटीची कुट्टी करा

Dairy Farming: जनावरांची वंशावळ सुधारणारे कोकणातील सरवणकर दांपत्य

Sugarcane Price Issue: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी घेतली PM मोदींची भेट; ऊसदराबाबत केली महत्त्वाची मागणी

Livestock Conservation: पशुधनाचे लोकसहभागातून संवर्धन ही काळाची गरज- कुलगुरू डॉ. नितीन पाटील

SCROLL FOR NEXT