Turmeric Crop Agrowon
ताज्या बातम्या

Turmeric Harvesting : हळदीचे पीक काढणीसाठी तयार

शिरपूर परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. हळद परिपक्व झाल्याने काही शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Turmeric Crop Farming शिरपूर जैन, जि. वाशीम ः जिल्ह्यात हळदीचे आगार (Turmeric Hub) म्हणून ओळख बनलेल्या शिरपूर व परिसरात हे पीक काढणीसाठी (Turmeric Harvesting) तयार होत आहे. काही शेतांमध्ये हळद परिपक्व झाली असून काढणीला प्रारंभही झाला. सार्वत्रिक स्वरूपाची काढणी लवकरच सुरू होणार आहे.

शिरपूर परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. हळद परिपक्व झाल्याने काही शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली आहे. हळद हे मसालावर्गीय नगदी पीक म्हणून मानले जाते.

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याच्या उपलब्धतेनुसार हळद लागवडीकडे गेल्या काही वर्षात कल वाढला. दर वर्षी सोयाबीन, हरभरा, गहू, तूर ही पारंपरिक पिके घेतानाच काही क्षेत्रात हळद लावली जाते.

आता तर या भागात हळद हे नगदी पीक म्हणून पाहिले जात आहे. यंदाच्या वर्षात लागवड केलेली हळद आता परिपक्व होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद काढणीला सुरुवात केली.

हळद काढणीनंतरची बरीच प्रक्रिया किचकट राहते. हळद तयार करण्यासाठी फार मोठी मेहनत आहे. हळद काढून झाल्यानंतर उकळणे, वाळवणे, पॉलिशिंग केली जाते. त्यानंतर विक्रीसाठी तयार होत असते.

या भागात हळदीचे सर्व साधारणपणे २५ ते ३० क्विंटल एकरी उत्पादन होते. बाजारात दर मिळाला तर शेतकऱ्यांना मोठा हातभार मिळतो.

जून-जुलैमध्ये लागवड करण्यात आलेली हळद काढणीला तयार झाल्याने मजुरांच्या उपलब्धतेनुसार काढणीची आता पुढील महिनाभर लगबग राहणार आहे.

सध्या परिसरातील हळद सुकली असून पालापाचोळा वाळला आहे. लवकरच हळद काढणीचा हंगाम आता वेग घेणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT