Tukaram Mundhe  Agrowon
ताज्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंडे पुन्हा पशुसंवर्धन आणि दुग्धविकासचे सचिव

Department Of Animal Husbandry : सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी बदली आहे.

Team Agrowon

Mumbai News : सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी बदली आहे. मुंडे यांची मे महिन्यात पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव म्हणून बदली करण्यात आली होती.

मात्र विभागाचे अप्पर मुख्य सचिव जगदीश गुप्ता यांच्या निवृत्तीला एक महिन्याचा कालावधी राहिल्याने त्यांना प्रतीक्षेत राहावे लागले होते. त्यानंतर मुंडे यांची मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. ३० जून रोजी गुप्ता हे निवृत्त झाल्यानंतर या विभागाला पूर्ण वेळ सचिव नव्हते.

अखेर मुंडे यांची पुन्हा येथे बदली करण्यात आली आहे. मुंडे हे नोव्हेंबर, २०२२ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे चर्चेत असलेले मुंडे यांच्याकडे महायुतीचे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मुंबई आयुक्तपदाची धुरा देण्यात आली होती.

मात्र आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे फारसे जमले नाही. शिवाय अनेक डॉक्टरांनी त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्याने त्यांच्याकडील धुरा काढून घेण्यात आली होती. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी आल्यानंतर अनेक ठिकाणी दौरे काढून अचानक तपासणी मोहीम राबविली होती. त्याविरुद्ध तक्रार करण्यात आल्या होत्या.

नोव्हेंबरनंतर तब्बल सहा महिन्यांनी मुंडे यांना पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नियुक्त केले होते. मात्र गुप्ता यांच्या निवृत्तीला एक महिन्यांचा कालावधी राहिला होता.

त्यामुळे गुप्ता यांची निवृत्ती संबंधित विभागातून झाल्याने प्रशासनिक बाबींच्या पूर्ततेला सुलभता येईल यासाठी त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्यात आले होते. तर नियुक्तीनंतरही मुंडे प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांना मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून नियुक्त केले, तर पुन्हा महिन्याभरात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement Scam: कांदा खरेदीतील आर्थिक गैरव्यवहारामुळे ‘नाफेड गो बॅक’

Pune ZP: जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

Ranbhaji Takla Modak: रानभाजी ‘टाकळा’पासून मोदक निर्मिती

Crop Insurance: नवीन पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अल्प

Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार

SCROLL FOR NEXT