Cotton Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Sowing : जळगावात कापूस लागवडीकडे कल कायम

Kharif Cotton Cultivation : कमी किंवा बेमोसमी पाऊस, दरांमधील चढउतार, मजूरटंचाई व इतर संकटे असून देखील यंदा साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : कमी किंवा बेमोसमी पाऊस, दरांमधील चढउतार, मजूरटंचाई व इतर संकटे असून देखील यंदा साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे १७ हजार हेक्टरने कमी लागवड झाल्याचे चित्र आहे. परंतु पीक लागवडीचा अंतिम अहवाल आलेला नाही. त्यात कापूस लागवडीत आणखी वाढ दिसू शकते, असाही संकेत आहे.

मागील हंगामात बेमोसमी पावसाचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला. यंदा पाऊस सरासरीएवढा किंवा किंचित कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पर्यायी पिकांचा विचार करावा, असा विचार शेतकरी करतात. मात्र नगदी पीक म्हणून कापूस पिकालाच पसंती मिळाली आहे. जिल्ह्यात खरिपातील एकूण पेरणी सात लाख ६७ हजार हेक्टर एवढी असते.

यात एकट्या कापसाची लागवड साडेपाच लाख हेक्टर एवढी आहे. पावसाचा पॅटर्न बदलला. मात्र पीक पॅटर्न बदलेनासा झाला आहे. कारण कापूस लागवडीत जळगाव जिल्हा आघाडीवरच आहे. जिल्ह्यातील काही किंवा मोजक्याच शेतकऱ्यांना २०२१-२२ मध्ये ११ ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर कापूस विक्रीपोटी मिळाला. तर कमाल कापूस उत्पादकांना सरासरी आठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

२०२२-२३ मध्ये अनेकांना ८७०० ते ६२००, ६८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २०२१-२२ मध्ये काही शेतकऱ्यांना दर चांगला मिळाला, यामुळे २०२२-२३ मध्ये कापूस लागवड वाढली, पण दरांच्या अपेक्षेने खर्चही शेतकऱ्यांनी केला, उत्पादन खर्च वाढला पण दर कमी किंवा हमीभावापेक्षा कमी मिळाल्याने अनेकांचे नुकसान झाले.

असा कटू अनुभव असल्याने यंदा सोयाबीन, मका व इतर पिकांची पेरणी काळ्या कसदार जमिनीत वाढेल, असे संकेत होते. परंतु यंदाही कमाल शेतकऱ्यांचा कापसाकडेच अधिकचा कल दिसत आहे.

पर्यायी नगदी पीक नाही

इतर नगदी पिकांमध्ये सूर्यफूल, ज्वारी, बाजरी, तूर, एरंडीचा समावेश आहे. मात्र शेतकरी या पिकांबाबत फारसे उत्सुक दिसत नाहीत. या पिकांच्या तुलनेत कापूस पीक परवडते, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे. यात काही शेतकऱ्यांनी कापसाची लागवड कमी केली, पण लागवड केलीच नाही, असा प्रकार झालेला दिसत नाही. लागवड कमी करून त्यात सूर्यफूल, तुरीची लागवड काही प्रमाणात झाली आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Extension : ‘कृषी विस्तार’ कार्यक्रमासाठी सव्वादोन कोटींचा आराखडा

Organic Turmeric Farming : हळद पिकात सेंद्रिय शेतीचे महत्त्व

Document Registration: मोठा निर्णय! मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी शक्य, क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द

Beekeeping India : अ‍ॅपिमोंडिया : मधमाशी पालकांचा जागतिक विचारमंच

Local Body Elections: मतदार यादीच्या विशेष पुनर्रचनेच काम पुढे ढकला ; केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

SCROLL FOR NEXT