Orange Growers Agrowon
ताज्या बातम्या

Orange Growers : संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांवर ‘स्वाभिमानी’चा आज मोर्चा

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. २९) दुपारी अकरा वाजता मोर्शी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

अमरावती : संत्रा उत्पादक (Orange Growers) शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (ता. २९) दुपारी अकरा वाजता मोर्शी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ॲड. प्रकाश पोफळे, रविकांत तुपकर, रवी पडोळे, प्रवीण मोहोळ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ऊस (Sugarcane) उत्पादकांसाठी आंदोलन करणारी संघटना अशीच स्वाभिमानीची ओळख होती. मात्र नजीकच्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना देखील हात घातला आहे. सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रविकांत तुपकर यांनी नुकताच अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर शासनाने या आंदोलनाची दखल घेत पीकविमा रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संत्रापट्ट्यातील समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. शासनाने संत्रा उत्पादकांसाठी विविध जिल्ह्यात विविध विमा हप्ता दर लागू केले आहेत. अकोला जिल्ह्यात चार हजार रुपये, नागपूर जिल्ह्यात २० तर अमरावती जिल्ह्यात १२ हजार रुपये असा विमा हप्ता भरावा लागणार आहे.

एकाच पिकासाठी वेगळा विमा हप्ता आकारण्यात असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. परिणामी संत्रा फळासाठी समान विमा हप्ता आकारण्यात यावा, संत्रा उत्पादक भागात प्रक्रिया उद्योगाची उभारणी करावी. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना हेक्टरी पन्नास हजार विनाअट भरपाई द्यावी, सोयाबीनला ८७०० व कापसाला १२३०० रुपये प्रति क्विंटलचा दर स्थिर राहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे, संत्रा साठवणूक करण्याकरिता वरुड, मोर्शी भागात कोल्डस्टोरेज उभारणी करावी.

कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के करावे, वरूड- मोर्शी तालुका ड्रायझोन मुक्त करा, मागील वर्षीचा व चालू वर्षीचा शंभर टक्के पीक विमा देण्यासाठी पीकविमा कंपन्यांना बाध्य करावे, जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतीला सरकारने कुंपण करून द्यावे, शेतमजुरांना सुरक्षा कवच, कृषी कर्जासाठी सीबिलची अट रद्द करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Germination Complaints: सोयाबीन उगवण तक्रारी आठ हजारांवर

Youth Protest: तरुणांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा; सरकार चर्चेसाठी तयार, ‘सीजेपी’च्या अटी कायम

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची चौकशी करा : राहुल गांधी

Farm Loan Waiver List: मुहूर्ताची यादी ५३३ शेतकऱ्यांची !

Monsoon Rain Forecast: पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ कायम

SCROLL FOR NEXT