Sugar Mills Agrowon
ताज्या बातम्या

FRP : नांदेड विभागात थकले ‘एफआरपी’ चे दीडशे कोटी

कारखान्यांवर व्याज आकारणी करण्याची मागणी

टीम ॲग्रोवन

नांदेड : ‘भाऊराव’, ‘पूर्णा’, ‘टोकाई’, ‘कुंटूरकर शुगर’सह नांदेड विभागातील बहुतांश कारखान्यांनी (Sugar Mill) शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम दिली नाही. आजघडीला नांदेड विभागातील साखर कारखानदारांकडे (Sugar Loan) दीडशे कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे.

त्यामुळे या सर्व कारखान्यांना विलंब व्याज आकारणी सुरू करावी, अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी साखर सहसंचालकांकडे केली आहे.राज्य सरकारने केंद्राच्या एकरकमी एफआरपी कायद्याविरोधात जाऊन दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचे धोरण स्वीकारले.

ऊस गाळपाला गेल्यानंतर पंधरा दिवसांत एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु राज्य सरकारने बेकायदेशीररीत्या केंद्राच्या कायद्याची मोडतोड करून दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचे धोरण स्वीकारले.

हंगाम बंद झाल्यानंतर संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळणे बंधनकारक होते. परंतु गाळप हंगाम बंद होऊन चार महिने उलटून गेले तरीही नांदेड विभागातील ‘भाऊराव’, ‘पूर्णा’, ‘टोकाई’, ‘बळीराजा’, ‘कुंटूरकर शुगर’, ‘एमव्हीकेशुगर’, ‘वाघलवाडा’,

‘देशमुख ग्रुप’, ‘सिद्धी शुगर’ यासह बहुतांश साखर कारखानदारांनी एफआरपी रक्कम अद्याप शेतकऱ्यांना दिलेली नाही.आजघडीला नांदेड विभागातील साखर कारखानदारांकडे दीडशे कोटी रुपये शेतकऱ्‍यांचे देणे बाकी आहे.

त्यामुळे या सर्व कारखानदारांना विलंब व्याज आकारणी सुरू करावी. शेतकऱ्यांना व्याजासह एफआरपी देण्यासाठी कारखानदारांना निर्देशित करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इंगोले यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nagpur Winter Session: कृषी विभागाचे निधीकडे लक्ष

Developed India: विकसित भारत घडविण्यासाठी ग्रामीण भारत एक निर्णायक शक्ती

Sugar Procurement: नवीन साखरेमुळे खरेदी मंदावली

Onion Import: बांगलादेश भारताकडून पंधराशे टन कांदा घेणार

Maharashtra Cold Wave: पूर्व विदर्भात थंडीची लाट शक्य

SCROLL FOR NEXT