ST Bus Agrowon
ताज्या बातम्या

Women ST Bus Concession : ‘महिला सन्मान’चा तीन लाख महिला प्रवाशांनी घेतला लाभ

Mahila Samman : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये (Budget 2023) महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून महिला सन्मान योजना (Mahila Samman Yojna) कार्यान्वित केली असून २३ मार्चपर्यंत पुणे विभागातील बसेसमधून एकूण ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

जिल्ह्यात शिवाजीनगर आगारातून १६ हजार ९०२, स्वारगेट १५ हजार ५५८, भोर २७ हजार १९२, नारायणगाव ५२ हजार ८८, राजगुरुनगर ४१ हजार ५३१, तळेगाव १४ हजार १०५, शिरूर १९ हजार ५२२, बारामती ४० हजार ९५२, इंदापूर ३२ हजार ३०९, सासवड १५ हजार ८१७, दौंड १० हजार २५६, पिंपरी-चिंचवड ८ हजार ९९६, एमआयडीसी १४ हजार ९१० असे एकूण जिल्ह्यात ३ लाख १० हजार १३८ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यातून एसटी महामंडळाला ८९ लाख १४ हजार १३८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते. यापूर्वीही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली आहे.

तसेच ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतींची प्रतिपूर्ती रक्कम राज्य शासनाकडून महामंडळाला देण्यात येत आहे, अशी माहिती पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT