Khadakwasla Dam Agrowon
ताज्या बातम्या

Water Storage: पुणे जिल्ह्यातील तीन धरणे भरली

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. गुरुवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) उच्चांकी २६३ मिलिमीटर पाऊस पडला.

अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील कळमोडी, आंध्रा, खडकवासला ही तीन धरणे शंभर टक्के भरली असून, नऊ धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. त्यामुळे धरणांतून मुठा, पवना, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, मीना या नद्यांना विसर्ग सोडण्यात आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. गुरुवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) उच्चांकी २६३ मिलिमीटर पाऊस पडला.

वडिवळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) १५४ मिलिमीटर, पवना १४७ मिलिमीटर, टेमघर १३२, वरसगाव १२९, गुंजवणी १२८, पानशेत १२८, खडकवासला ५४, कळमोडी १०३, कासारसाई ७०, चासकमान ८७, भामा आसखेड ८६, आंध्रा ८७, नीरा देवघर ८२, येडगाव ७७, वडज ६६, डिंभे ६५, माणिकडोह ६१, भाटघर ४०, पिंपळगाव जोगे ३८, नाझरे २१, चिल्हेवाडी २० मिलिमीटर पाऊस पडला.

तर शेटफळ, घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही (Catchment Area) तुरळक सरी बरसल्या. याशिवाय लोणावळा घाटमाथ्यावर २१३ मिलिमीटर, वळवण १७८, ठोकरवाडी १७२, शिरोटा ८० मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे गेल्या चोवीस तासांत तब्बल १८.९९ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा धरणांत दाखल झाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे मिळून एकूण ८०.११ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट काही प्रमाणात कमी झाले आहे.

जिल्ह्यात मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे या धरणांत एक जूनपासून तब्बल १५.१ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) १९.८४ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा झाला आहे. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी आणि घोड या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात १७ ते ७७ मिलिमीटरच्या दरम्यान पाऊस कोसळला. त्यामुळे धरणांत १४.३७ टीएमसी एवढा पाणीसाठा दाखल झाला आहे.

गुरुवारी (ता.१४) सकाळी या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू : विसर्ग-क्यूसेसमध्ये

धरण --- पाण्याचा विसर्ग

खडकवासला -- ६,०७३

कासारसाई -- १,६००

कळमोडी -- १,८८४

आंध्रा --- १,४६२

वीर --- १,०४९

येडगाव -- ७,२२५

वडज --- २०२

चिल्हेवाडी -- २,५२६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT