Agrowon Agriculture Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Agri Exhibition : ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

विदर्भ, मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना शेतीमधील विविध समस्यांशी आधुनिक तंत्रांच्या मदतीने लढण्याचे बळ देणाऱ्या तसेच राज्याच्या प्रयोगशील शेतीला चालना देणाऱ्या ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शन-२०२३’ची जय्यत तयारी औरंगाबादमध्ये सुरू आहे.

Team Agrowon

पुणे ः विदर्भ, मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांना शेतीमधील विविध समस्यांशी आधुनिक तंत्रांच्या (Modern Technology) मदतीने लढण्याचे बळ देणाऱ्या तसेच राज्याच्या प्रयोगशील शेतीला चालना देणाऱ्या ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शन-२०२३’ची (Agriculture Exhibition) जय्यत तयारी औरंगाबादमध्ये सुरू आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने १३ ते १६ जानेवारीदरम्यान औरंगाबादच्या चिकलठाणा ‘एमआयडीसी’मधील ‘कलाग्राम’चा परिसर शेतकऱ्यांनी फुलून जाणार आहे.

‘सकाळ-अॅग्रोवन’चे राज्यव्यापी कृषी प्रदर्शन म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान व माहितीची अस्सल मेजवानी, असे समीकरण तयार झालेले आहे. यात कृषी व संलग्न क्षेत्राची परिपूर्ण माहिती मिळते. त्यामुळेच कृषी क्षेत्रातील वर्तमान स्थितीचा ज्ञानयज्ञ म्हणून या प्रदर्शनाचा उल्लेख केला जातो.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक ‘कन्हैया अॅग्रो’ आहेत. तसेच असोसिएट पार्टनर म्हणून ‘पूर्वा केमटेक प्रायव्हेट लिमिटेड’ हे आहेत. याशिवाय केबी, चितळे डेअरी, एमआयटी औरंगाबाद, तृप्ती हर्बल, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, मेडा महाऊर्जा, आत्मा औरंगाबाद हे को-स्पॉन्सर्स आहेत; तर इफ्को हे गिफ्ट स्पॉन्सर्स आहेत.

देशातील व राज्यातील विविध कृषी संशोधन संस्था, कृषी संबंधित सरकारी व निमसरकारी विभाग, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे क्षेत्रातील कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

तसेच, नामांकित ट्रॅक्टर कंपन्या आपल्या आधुनिक यंत्रांसह प्रदर्शनाला हजेरी लावत आहेत. शेतकऱ्यांना यंदा हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, ड्रीप, टिश्युकल्चर अशा विविध क्षेत्रांतील नामवंत कंपन्यांच्या उत्पादनांची माहिती मिळणार आहे. या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करता येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शेतीमधील समस्यांना सतत तोंड द्यावे लागते. मात्र त्यावरील माहिती व तंत्रज्ञानाच्या उपायांपर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गांचा दीपस्तंभ म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून ‘ॲग्रोवन’ काम करतो आहे.

त्यातून देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध तज्ज्ञ, संस्था, यंत्रणा आणि प्रयोगशील शेतकरी एकमेकांशी जोडले गेले आहेत. ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शन आता तर शेतकरी व तज्ज्ञांच्या भेटीगाठींचे, प्रयोगांच्या देवाणघेवाणीचे एक हक्काचे ठिकाण बनले आहे. त्यामुळेच ‘अॅग्रोवन’ची यापूर्वीची २०१८ व २०१९ मधील कृषी प्रदर्शने गर्दीचे उच्चांक मोडणारी ठरली आहेत.

प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये ः

- ट्रॅक्टर कंपन्या, अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचा सहभाग

- खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल्स

- नामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग

- तज्ज्ञांच्या भेटीगाठी आणि प्रयोगांची होणार देवाणघेवाण

- प्रदर्शनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना बक्षिसे जिंकण्याची संधी

- वैविध्यपूर्ण फळ प्रदर्शन शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार

एकाच छताखाली नामवंत ‘अॅग्रो ब्रॅण्ड्‌स’

अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने देशविदेशातील नामवंत ‘अॅग्रो ब्रॅण्ड्‌‌स’ औरंगाबादेत एकाच छताखाली येत आहेत. त्यानिमित्ताने बागायती शेती, कोरडवाहू शेती किंवा संरक्षित शेतीमधील समस्यांवरील उपाय, त्यातील नवनवीन तंत्र समजावून घेण्याची नामी संधी शेतकऱ्यांना मिळते आहे.

याशिवाय ‘पूर्वा केमटेक’कडून आयोजित केलेले वैविध्यपूर्ण फळ प्रदर्शन शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्र, यंत्र, उपकरणे या वेळी प्रात्यक्षिकांसह बघण्यास मिळतीलच; पण आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीदेखील मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT