Tembhapuri Water Project Agrowon
ताज्या बातम्या

Water Project : नऊ वर्षांत तिसऱ्यांदा टेंभापुरी तुडुंब

शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्प तब्बल नऊ वर्षांनंतर शनिवारी (ता. ८) रात्री एकच्या सुमारास तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरला आहे.

टीम ॲग्रोवन

शेंदूरवादा, जि. औरंगाबाद : शेंदूरवादा (ता. गंगापूर) परिसरातील टेंभापुरी मध्यम प्रकल्प (Tembhapuri water Project) तब्बल नऊ वर्षांनंतर शनिवारी (ता. ८) रात्री एकच्या सुमारास तिसऱ्यांदा पूर्ण क्षमतेने भरला आहे.

सांडव्यातून पाणी विसर्गाला (Water Discharge) सुरुवात झाल्याने परिसरातील ४२ गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पातून २२ गावांना राबवण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून (Water Supply Scheme) पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. मागील काही दिवसांपासून धरण कार्यक्षेत्रात पावसाने जोरदार (Rain Update) हजेरी लावली.

या मुळे परिसरातील पाणीसाठ्यात टप्प्याटप्प्याने वाढ झाली. हे धरण नागझरी, लवकी नदीवर असून, धरणाची क्षमता २१ दशलक्ष घनमीटर आहे. या धरणाच्या लाभ क्षेत्रात एकूण ४२ गावांसह वड्या वस्त्यांचा समावेश आहे. २२ गावांना कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची सोय केली आहे.

गोदावरी नदीपट्ट्यापासून वंचित राहिलेल्या गावांना हे धरण वरदान ठरलेले आहे. सततच्या अवर्षणप्रवण क्षेत्रात धरणाचा पाणी येणारा भाग असल्याने हे धरण २०१२ पासून कोरडे होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पासून वरुणराजाने सुरुवातीलाच जोरदार हजेरी लावल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन पूर्ण क्षमतेने भरत सांडवा ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे.

६ तासांत साडेतीन फुटाणे ाणीपातळीत वाढ

टेंभापुरी मध्यम प्रकल्प कालपर्यंत साडेतीन फूट पाणीपातळी रिकामी होती. तुर्काबाद महसुली मंडळात अचानक सुरू झालेल्या चांगला पावसामुळे सहा तासात साडेतीन फूट पाण्याची आवक होत प्रकल्प ओसंडून वाहत आहे.

भास्करगिरी महाराजांच्या हस्ते जलपूजन...

हा प्रकल्प गेल्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने जल पूजन देवगड संस्थांचे भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी गिरीश्रमाचे कैलासगिरी महाराज, वारकरी आश्रमाचे नारायणनंदगिरी महाराज, विजय महाराज खेडकर, मेटे महाराज, दीपक गुरू जोशी, बबनराव गायकवाड, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. त्याच परंपरेने या वर्षी ही लवकरच भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते जलपूजन करण्याचे नियोजन टेंभापुरी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Milk : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; आता ‘गोकुळ’ निशाण्यावर

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : राज्यातला सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचा; वय अवघे...

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

SCROLL FOR NEXT