Onion Traders Strike : कांदा निर्यात शुल्क रद्द करावे आणि नाफेडचा कांदा विक्रीवर थांबवण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यातील (Nashik Onion Issue) कांदा लिलाव पूर्णतः बंद आहेत. या प्रश्नावर आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कांदा व्यापारी आणि उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. परंतु बैठकीत तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, सांयकाळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष्य गोयल यांची भेट घेऊन कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
कांदा निर्यातीवरील शुल्क कमी करावे, नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची विक्री मार्केटमध्ये न करता रेशनवर करावी, बाजार समितीने आकारलेली मार्केट फीचा दर प्रति शेकडा 100 रुपयास 1 रुपयाऐवजी 100 रुपयास 0.50 पैसे या दराने करण्यात यावा. आडतीचे दर संपूर्ण भारतात एकच असावे आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार दि. १९ पासून लिलाव बंदचा निर्णय घेतला.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समिती आणि उपसमितीमध्ये कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहे. त्यामुळे सुमारे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रश्नावर आज मुंबईत उपमुख्यमत्री अजित पवार, पणनमंत्री अब्दुल सत्तार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह व्यापारी व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.
या बैठकीत कांदा व्यापारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. परंतु सरकारच्यावतीने कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक आणि शेतकऱ्यांची समजूत काढण्यात सरकारला अपयश झाले. त्यामुळे आजही व्यापाऱ्यांनी बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सायंकाळी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष्य गोयल यांची भेट घेणार आहे. त्यानंतर राज्य शासन योग्य तो निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.