Amravati APMC
Amravati APMC Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election : बाजार समिती मतदार यादीतील सुधारणांना आक्षेप नाहीच!

Team Agrowon

अमरावती : बाजार समितीच्या निवडणुकांसाठी (Amravati APMC Election) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा कायम आहे. या दरम्यान मतदारयादीत (APMC Voter List) निवडणुकीच्या पाच दिवस अगोदरपर्यंत नावे समाविष्ट करण्याच्या सुधारणेवर आक्षेप घेण्यासाठी अद्याप कुणीही समोर आलेले नाही.

जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. अद्याप प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. या दरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नवीन मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये नव्याने निवडून आलेल्या सेवा सहकारी व ग्राम पंचायतीच्या सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.

काही ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांनी सदस्यपद रिक्त आहेत. तर, काही सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यामुळे नव्याने निवडून येणाऱ्या सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकांच्या पाच दिवस अगोदरपर्यंत मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची सुधारणा नियमात करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने या सुधारणेवर आक्षेप असल्यास त्या दाखल करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या आक्षेपांवर सुनावणी करण्यात आल्यानंतर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील दहा बाजार समितीच्या कार्यकक्षेतील एकही आक्षेप अद्याप आलेले नाहीत. नवीन सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अद्याप प्राधिकरणाकडून सदस्यांची अर्हता दिनांक निश्‍चित करण्यात आलेली नाही. ३० एप्रिलपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका घेण्यास उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

Rain Update : कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT