Pomegranate
Pomegranate Agrowon
ताज्या बातम्या

Pomegranate : आटपाडी तालुक्यात होतेय डाळिंबांची चोरी

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सांगली ः नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) आणि रोगराईच्या कचाट्यातून यशवंत मेटकरी यांनी डाळिंब बाग (Pomegranate Orchard) वाचविली. त्यांच्या शेतात ४००० हजार डाळिंबाच्या झाडावर लालचुटूक डाळिंब बहरले होते. येत्या आठवड्यात डाळिंबाची विक्री (Pomegranate Sell) होणार होती. व्यापारीही बांधावर येत होते. त्यातील एका व्यापाऱ्याने डाळिंबाला प्रति किलो १४८ रुपये असा दरही ठरला होता.

पण अचानक रात्रीच्या वेळी चोरट्यांनी ५०० झाडावरील डाळिंब रातोरात लंपास केली. चार लाखांचे नुकसान झाले. त्याची तक्रारही आटपाडी पोलिस ठाण्यात केली. पण त्याचा काही उपयोग होईल की नाही याची कल्पनाही नाही. ‘कष्टाने पिकवलेली डाळिंब चोरून गेल्याने एक नवे संकट आले आहे,’ अशी व्यथा परिसरातील डाळिंब उत्पादकांनी मांडली.

गेल्या चार वर्षांपासून डाळिंबावर नैसर्गिक आपत्ती आणि पाऊस, कीड रोगांच्या संकटाची मालिका सुरू आहे. यंदाही त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करत डाळिंबाच्या बागा फुलवल्या आहेत. मृग हंगामातील डाळिंब आता काढणीला आली आहेत. त्यामुळे अनेक व्यापारीही आटपाडी तालुक्यात डाळिंबाची खरेदी करण्यासाठी दाखल होत आहेत. मात्र चोरीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

मेटकरी दोन दिवसांत डाळिंब काढणी सुरू करणार होते. त्याची विक्री करून दोन पैसे आली, की दिवाळी आणि इतर खर्च करता येईल, असे त्यांचे नियोजन होते. मेटकरी म्हणाले, ‘‘रात्रीच्या वेळी चोर डाळिंब बागेत घुसले. मोठी-मोठी अर्थात दर्जेदार डाळिंब तोडली. क्रेटमध्ये भरून टेम्पो घेऊन रातोरात पसार झाले. सकाळी शेतात गेलो, तर शेतातील डाळिंब खाली पडली असल्याचे दिसले.

त्यांनी संपूर्ण शेतात फेरफटका मारला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ५०० झाडांवरील सुमारे ३ टन डाळिंबाची चोरी झाली आहे. त्यामुळे पायाखालची जमीनच सरकली.’’ वास्तविक पाहता, गेल्या पंधरा ते वीस दिवसांत डाळिंब चोरीचे पाच प्रकार घडले आहेत. कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाची चोरी झाल्याने तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. त्यामुळे डाळिंब पिकाची राखण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता पोलिस डाळिंब चोरांना पकडणार का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

कष्टाने डाळिंब पिकवले होते. त्याचा दर ठरला होता. पण डाळिंबाची चोरी झाली. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास करतो असे सांगितले आहे. चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
यशवंत मेटकरी, आटपाडी, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Earthquake Migration : लोकप्रतिनिधींची मागणी, फरफट सर्वसामान्यांची

Fodder shortage : नाशकात चाऱ्या टंचाईवरून विरोधाभास? पशुपालकांची चिंता; प्रशासन निर्धास्त

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

SCROLL FOR NEXT