Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Farming : शहापूर तालुक्यात भात लावणीच्या कामाला वेग

Team Agrowon

Shahpur Paddy Cultivation News : खर्डी : शहापूर तालुक्यात लावणीच्या कामाला वेग आला आहे. पण मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे नाशिक, मालेगाव, घोटी, कल्याण आणि कर्जत येथून मजूर आणावे लागत आहेत, पण त्यांना दररोज पाचशे ते सहाशे रुपये मजुरी द्यावी लागत असल्याने भातशेती परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पूर्वापार चालत आलेल्या रूढीपरंपरेनुसार शेतातील देवांना पोळीभाजीचा व गोडाचा नैवेद्य देऊन शेतकऱ्यांनी शेतीच्या लावणीला सुरुवात केली. मात्र एकाच वेळी तालुक्यातील ग्रामीण भागात लावणीच्या कामाला सुरुवात झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. अशात मजुरीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेती परवडत नसल्याचे रामनाथ हळकुंडे यांनी सांगितले.

शेती व्यवसाय कष्टाचा आणि खर्चिक झाल्याने व शेतीसाठी झालेल्या खर्चात पिकून आलेले उत्पादन(भात) पुरेसे येत नसल्याने शेती करणे आता अवघड झाल्याचे शेतकरी संतोष कालचिडा यांनी सांगितले.

शहापूर तालुक्यातील टिटवाळा, डोंबिवली यांसारख्या शहरात असलेल्या वीटभट्टी आणि बांधकाम व्यावसायिकांकडे कामाला जात आहेत. त्यामुळे येथे मजुरांची टंचाई भासत आहे, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

कामात घरातील माणसांची मदत

भातशेतीसाठी प्रशिक्षित मजुरांची आवश्यकता असते, पण ते मिळत नसल्याने घरातीलच माणसांची मदत घ्यावी लागत आहे. पण त्यांना जास्त कामाची सवय नसल्याने ते आजारी पडत असतात, असे शेतकरी चंद्रकांत घरत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी सगुणा भात तंत्रज्ञान पद्धतीने भाताची लागवड करावी. त्यामुळे मजुरी व मेहनत ही कमी लागेल व उत्पन्न जास्त येईल. तालुक्यातील शेई, भातसई व अल्याणी १३६ हेक्टरवर सगुणा पद्धतीने भात लागवड करण्यात आली आहे.

- विलास घुले, कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती

Ginger Rate : आले दरात पंधरा दिवसांत चार ते पाच हजारांची घट

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचा इशारा

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT