Ujani Dam Agrowon
ताज्या बातम्या

‘उजनी’ची पाणीपातळी पोहोचली ८० टक्क्यांवर

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उणे पातळीत असलेल्या उजनी धरणाची (Ujani Dam) पाणीपातळी (Water Storage) आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

ॲग्रोवन वृत्तसेवा

सोलापूरः जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये (Ujani Dam) वरच्या धरणाकडून येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात काहीशी घट झाली असली, तरी पाण्याच्या विसर्गात सातत्य आहे. त्यामुळे बुधवारी (ता. ३) धरणाची पाणीपातळी ८० टक्क्यांवर पोहोचली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उणे पातळीत असलेल्या उजनी धरणाची (Ujani Dam) पाणीपातळी (Water Storage) आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तब्बल ८० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. अवघ्या महिनाभरातच धरण शंभर टक्क्यांपासून अवघ्या काही अंतरावर आले आहे.

विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झाला आहे. पण धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात धरणांतील पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस आणि तिकडील धरणातील अतिरिक्त पाणी उजनी धरणात सोडण्यात येत आहे. बुधवारीही (ता.३) दौंडकडून उजनी धरणात ३१०५ क्युसेक इतके पाणी सुरू होते.

उपयुक्त साठा ४३ टक्के

उजनी धरणामध्ये बुधवारी (ता.३) एकूण पाणीपातळी ४९५.८८५ मीटरपर्यंत होती. तर पाण्याचा एकूण साठा १०६.४७ टीएमसी एवढा राहिला. तर त्यापैकी उपयुक्त साठा ४२.८१ टीएमसी इतका होता. तर पाण्याची टक्केवारी ७९.९१ टक्क्यांपर्यंत पोहोचली. यंदा हंगामाच्या दुसऱ्याच महिन्यात उपयुक्त साठा जवळपास ४३ टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Latur Rain : कर्नाटक सीमावर्ती भागांत पावसाने नुकसान

Rain Update : सिंधुदुर्गात संततधारेने दाणादाण

Warna Dam : सांगलीत वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

khandesh Water Projet : चाळीसगावातील मन्याड प्रकल्प अल्पावधीत ७५ टक्के भरला

SCROLL FOR NEXT