River Agrowon
ताज्या बातम्या

Sand Excavation : पुलालगतचे पात्रही ओरबाडणे सुरू

गिरणा पात्रातील बांभोरीजवळील पुलासभोवतालच्या वाळूउपशाने पूल ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याची स्थिती असताना, या पुलाला समांतर रेल्वेपूल व नव्याने होत असलेल्या बायपास मार्गावरील पुलालगतही नदीपात्र ओरबाडणे सुरूच आहे.

Team Agrowon

जळगाव, ता. २७ : गिरणा पात्रातील बांभोरीजवळील पुलासभोवतालच्या वाळूउपशाने (Sand Excavation) पूल ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याची स्थिती असताना, या पुलाला समांतर रेल्वेपूल व नव्याने होत असलेल्या बायपास मार्गावरील पुलालगतही नदीपात्र (River Bed) ओरबाडणे सुरूच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत कारवाई करूनही वाळूमाफियांची मुजोरी कमी व्हायचं नाव घेत नाही.

गुजरातला खानदेश, विदर्भाशी कनेक्ट करणारा दुवा म्हणून गिरणा नदीवरील महामार्गावरील बांभोरी पुलाची ओळख आहे. मात्र, वाळूमाफियांच्या मुजोरीने या पुलालगत बेसमुार वाळूउपसा होत असून, पुलाचा पायाच खचण्याची वेळ आलीय आणि त्यामुळे पूल ‘डेंजर झोन’मध्ये आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पुलाचे नव्याने ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा विषय ‘सकाळ’ने मांडल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाने त्याबाबत संमती दर्शवली आहे.

रेल्वेपुलालाही धोका

महामार्गावरील बांभोरी पुलालगत दोनशे मीटरपर्यंतच्या अंतरात वाळूउपशाला बंदी आहे. ती पाचशे मीटरपर्यंत वाढविण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली खरी. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उलटपक्षी आता वाळूमाफिया थेट बांभोरी पुलाला समांतर रेल्वेपुलापर्यंतच्या साईटपर्यंत पोचले असून, त्या ठिकाणाहून वाळूउपसा होत आहे. त्याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

नव्या पुलाच्या कामावर प्रश्‍न

बांभोरीचा पूल धोक्यात, रेल्वेपुलालगतही गंभीर स्थिती निर्माण होत असताना, वाळूमाफियांची वक्रदृष्टी आता बायपास महामार्गांतर्गत होणाऱ्या निर्माणाधीन पुलाच्या पात्रावरही पडली आहे. ज्या ठिकाणी बायपास महामार्गावरील पुलाचे काम सुरू आहे. त्याठिकाणीही वाळूउपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकारांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास बांभोरी व रेल्वे पुलाचे अस्तित्व धोक्यात येईल व नव्याने निर्माण होणाऱ्या पुलाचे निर्माणाआधीच आयुष्य संपेल. प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT