कारंजा बाजारात सोयाबीनची आज 25 मे रोजी 4000 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला(soybean) आज किमान 6050 रुपये तर कमाल 6800 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6525 रुपयांवर होता. कारंजा बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.अकोला बाजारात सोयाबीनची 1218 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5400 रुपये होता. तर कमाल भाव 6885 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6395 चा भाव मिळालाय.मेहकर बाजारात सोयाबीनला किमान 6400 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6900 रुपयाने झाले. सरासरी दर 6600 रुपये मिळाला.तसेच चिखली बाजारात सोयाबीनला 6000 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 7251 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6626 रुपये मिळाला.
मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या हिंगोली बाजारामध्ये आज 25 मे रोजी 500 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6400 रुपये ते कमाल 6890 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6645 रुपयांनी झालेत. बीड बाजारात आज सोयाबीनची आवक वाढली होती.तिकडे चाकूर बाजारात 25 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6630 तर कमाल 6800 रुपयांचा दर(rate ) मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6681 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे भोकर बाजारात किमान 6111 रुपये तर कमाल 6511 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6311 होता