Water Management Agrowon
ताज्या बातम्या

Water Management : जल व्यवस्थापनाबाबत  ‘वारसा पाण्याचा’  ग्रंथ  मौलिक

‘वारसा पाण्याचा’ ग्रंथाचे लेखक म्हणून डॉ. दि. मा. मोरे हे आर्थर कॉटन यांचा पाण्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत.

Team Agrowon

नाशिक : ‘वारसा पाण्याचा’ (Water Management) ग्रंथाचे लेखक म्हणून  डॉ. दि. मा. मोरे हे आर्थर कॉटन यांचा पाण्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत. सर कॉटन हे भारतातील लोकांना जलसिंचनाचा वापर कसा करावा व शिकवायला आले होते.

त्या वेळी त्यांनी पाहणी करून, जो निष्कर्ष काढला तोच निष्कर्ष डॉ. मोरे यांच्या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. त्यामुळे जल व्यवस्थापनाबाबत ‘वारसा पाण्याचा’ ग्रंथ मौलिक आहे, असे प्रतिपादन के. के. शिक्षण संस्थेचे सल्लागार समितीचे अध्यक्ष व ‘एमकेसीएल’चे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी केले. 

के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात ‘वारसा पाण्याचा’ या पाण्याचा संचय आणि संवर्धन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सावंत बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर लेखक डॉ. दि. मा. मोरे, संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संचालक मंडळ, सचिव प्रा. के. एसबंदी, स्माईल व स्पिनॅचचे सचिव अजिंक्य वाघ, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, प्रा. अ. रा. सूर्यवंशी, विलास शेळके, डॉ. प्राजक्ता बस्ते तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

सावंत म्हणाले, की ग्रंथाचे अनावरण माझ्या हस्ते होत असले तरी या मागचे श्रेय कै. बाळासाहेब वाघ यांचेच आहेत. डॉ. मोरे लिखित ग्रंथाचे प्रकाशन के. के. वाघ शिक्षण संस्थेने करावे, असा वाघ यांचा आग्रह होता. त्याचप्रकारे या ग्रंथाचे हिंदी भाषांतर व्हावे, अशी भावना सावंत यांनी व्यक्त केली. ग्रंथात जलव्यवस्थापनातील ६३ आश्चर्ये, मौलिक सूची आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT