Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची परंपरा सुरू

Team Agrowon

Maharashtra Budget Session 2023 मुंबई : दक्षिणेतील राज्यांप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची परंपरा आपल्या राज्यांत कधीच नव्हती. ती आता तुमच्या राज्यात सुरू झाली आहे.

जयसिंघांनी प्रकरणात तुमच्या मनाला काय वेदना झाली असेल, त्या वेळी विरोधकांना विनाकारण जेलमध्ये टाकल्यावर काय अवस्था झाली असेल याचा जरा विचार करा, असा परखड सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांना विधानसभेत केला.

२९२ अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावाअंतर्गत राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले, तुम्ही छगन भुजबळ, अनिल देशमुख, संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे.

ज्या वेळी अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी तुमच्या घरी काय अवस्था झाली होती, तुमच्या मनाला काय वेदना झाल्या याचा विचार करा. ज्या वेळी विरोधकांना जेलमध्ये टाकले, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला त्या वेळी त्यांच्या घराची काय अवस्था झाली याचाही विचार करा. घरातील माणसे घरात राहत नाही, या सगळ्यांनी काय सहन केले हे सर्वांनी पाहिले आहे.

गृहमंत्री कणखर असायला हवा, असेही पवार म्हणाले. विरोधकांकडे बोट दाखवून राजकारण करू नका, राजकारण करण्यासाठी खूप मोठे मोकळे मैदान पडले आहे. कुटुंबापर्यंत जाऊ नका, असा सल्लाही पवार यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, ‘राज्यात नैसर्गिक आपत्ती, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे, हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे, महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे,

राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत, दिवसा-ढवळ्या तलवारी, कोयते नाचवले जात आहेत, गोळीबार करून दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत, राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले, विकासाचा वेग डबल होईल, म्हणून सांगितले गेले. मात्र राज्याच्या विकासाचा वेग डबल होण्याऐवजी गुन्ह्यांचा वेग डबल झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

SCROLL FOR NEXT