Sahyadri  Agrowon
ताज्या बातम्या

Sahyadri Mountain : सह्याद्रीच्या कुशीतील भाकरीची कहाणी

आजच्या भटकंतीत मी सह्याद्रीच्या (Sahyadri) शुरवीर शेतकरी मायभगिनींना भेटलो. पर्यटकांना स्वादिष्ट भाजीभाकरी खाऊ घालण्यासाठी त्या तुफान साहस करतात. याच मायभगिनींच्या भेटीचा हा अनुभव...

मनोज कापडे

आजच्या भटकंतीत मी सह्याद्रीच्या (Sahyadri) शुरवीर शेतकरी मायभगिनींना भेटलो. पर्यटकांना स्वादिष्ट भाजीभाकरी खाऊ घालण्यासाठी त्या तुफान साहस करतात. या शेतकरी (farmer) महिला रोज पहाटे उठून शिधा साहित्याचे भले मोठे बोचके डोक्यावर घेत दुर्गम भागातून निघतात.

पोटासाठी त्या त्यांची तान्ही मुले, वयोवृद्ध आईबाबा किंवा सासू सासऱ्यांना घरीच गावाच्या भरवशावर सोडून देतात. उपाशीपोटीच त्या गावातून निघतात. जंगलात घुसतात. पाऊस, वारा, वादळात त्या ओढे पार करतात. चिखल तुडवतात. काट्याकुट्याला पायात घेत खोल दरीच्या बाजूने गड चढतात. कातिल वारा त्यांना लोटतो. त्या ठामपणे चालत असतात. कातळ दऱ्या त्यांना ओढतात; पण त्या घोरपडीगत जीव मुठीत धरून चालतात.

अनेक तास त्या अखंड पाच-पाच किलोमीटर डोक्यावर भाजी भाकरीचा कच्च्या शिधा घेत ताकदीने चालतात. वाटेत पाण्याऐवजी त्या स्वतःच्या कष्टाचा घाम पितात. अखेर गडावर पोहोचतात. पोट उपाशी असते. मात्र, त्या आशाळभूतपणे पर्यटकाची वाट बघतात. तो येताच लगबगीने पहिली भाकरी थापतात.

जेऊखाऊ घातल्यानंतर ढेकर देत एखादा शहरी श्रीमंत पर्यटक जेव्हा, "भाकरी इतकी महाग कशी?" असे विचारतो तेव्हा त्या अबोल होतात. खळकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. पण, भाकरीच्या बोहनीची पहिली नोट हाती येताच त्यांना अत्यानंद होतो. त्या आनंदात स्वतःची भूक विसरुन पुन्हा दुसरी भाकरी थापू लागतात. असे दिवसभर चालते. संध्याकाळी पुन्हा गडावरून दऱ्या, डोंगर, जंगलातून गावाकडे या मायभगिनी पुन्हा घराकडे लगबगीने निघतात.

अर्थात, भटकंतीत मला सर्व ठिकाणी असे कष्टाळू विक्रेते भेटत नाहीत. अनेकदा बिगर शेतकरी विक्रेते निकृष्ट खाद्य पुरवून महागदेखील विकतात. पण, अशा झुंझार कष्टाळू महिला शेतकरी भगिनींकडून भाकरी विकत घेताना मी कधीच किंमत विचारत नाही.

कारण, मला ही जाणीव असते की, त्यांच्या त्या गोड भाकरी केवळ धान्यापासून नव्हे; तर त्यांच्या घाम आणि रक्तापासून तयार झालेल्या असतात..!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT