Nursery Agrowon
ताज्या बातम्या

Latest Horticulture News : कलमे, रोपांचा साठा दोन कोटींच्या पुढे

Nursery Business : राज्याच्या फलोत्पादनाला चालना देण्यासाठी शासकीय व खासगी रोपवाटिकांनी संयुक्तपणे सुरू ठेवलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या फलोत्पादनाला चालना देण्यासाठी शासकीय व खासगी रोपवाटिकांनी संयुक्तपणे सुरू ठेवलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. त्यातून आता राज्यात दोन कोटींपेक्षा जास्त कलमे व रोपांचा साठा तयार झाला आहे.

फळबागांचा विस्तार झपाट्याने होत असताना दुसऱ्या बाजूला राज्यात रोगग्रस्त लागवड साहित्याची विक्री वाढलेली आहे. त्यातून कीड व रोगग्रस्त फळबागांची संख्याही वाढते आहे. रोगमुक्त रोपांचा वापर हाच उपाय आहे. त्यामुळे अनधिकृत रोपवाटिकांमधील तसेच कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या फळपिकांचे लागवड साहित्य खरेदी करू नये, असा आग्रह फलोत्पादन विभागाने धरला आहे.

राज्यात मान्यताप्राप्त रोपवाटिकांमध्ये सध्या १.८० कोटी कलमे आणि ३०.७२ लाख रोपे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय रोपवाटिका संकेतस्थळावर रोपवाटिकांची नोंदणी व्हावी. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून मानांकन मिळविणाऱ्या रोपवाटिकांमधून प्राधान्याने कलमे व रोपांची उचल व्हावी, यासाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण व फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे...

- खासगी रोपवाटिका तपासणीसाठी पथके नियुक्त

- राज्यात सध्या १४६ शासकीय रोपवाटिका

- ७९ रोपवाटिकांचे मानांकन पूर्ण

- याशिवाय कृषी विद्यापीठाच्या ४६ पैकी १२ रोपवाटिकांना मानांकन

- ११५५ पैकी १०४ रोपवाटिकांचे झाले मानांकन

- यातील २३१ रोपवाटिकांची नोंदणी राष्ट्रीय रोपवाटिका संकेतस्थळावर झाली

उपलब्ध गुणवत्तापूर्ण फळरोपे व कलमांची संख्या आता दोन कोटींच्या पुढे गेली आहे. याच दर्जेदार लागवड साहित्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करायला हवा. अनधिकृत रोपवाटिकांमधील गुणवत्ताहिन साहित्याची खरेदी टाळावी.
- डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT