Marathawada Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Updates: मराठवाड्यात पावसाची उसंत

जवळपास आठवडाभरापासून मराठवाड्यातील (Marathawada Rain) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत पावसाची हजेरी सुरू होती.

ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत शुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने उसंत घेतली. पावसाची ही उघडीप व झालेले सूर्यदर्शन पिकांसाठी पोषक ठरण्याची शक्यता आहे.

जवळपास आठवडाभरापासून मराठवाड्यातील (Marathawada Rain) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत पावसाची हजेरी सुरू होती. बीड, लातूर, उस्मानाबाद व जालना जिल्ह्यांतील काही भागांत पावसाचा जोर अधिक राहिला. आठवडाभरात सतत ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शनही झाले नव्हते. शुक्रवारी (ता.१५) मात्र अनेक ठिकाणी सूर्यदर्शन झाले.

शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोविस तासांत औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ४९ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. १६ मंडलांकडे पावसाने पाठ फिरवली. सोयगाव तालुक्यातील सावलदबारा मंडळात झालेला २२.८ मिलिमीटर पाऊस दखलपात्र राहिला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी २१ मंडलांकडे पावसाने पाठ फिरवली, तर २८ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३४ मंडलांत पावसाचा टिपूसही बरसला नाही. तर २९ मंडलांत पावसाची तुरळक हजेरी लागली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ७ मंडलांत पावसाचा थेंबही पडला नाही. तर चाकूर व लातूर तालुक्यांत काही मंडलांत हलका मध्यम पाऊस पडला. इतरत्र पावसाची हजेरी तुरळकच राहिली.

उस्मानाबादमध्ये उघडीप

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ११ मंडलांत पावसाचा थेंबही पडला नाही. उर्वरित ३१ मंडलांत तुरळक पावसाची हजेरी लागली. उमरगा तालुक्यात पावसाचा टिपूसही बरसला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT